• Thu. Feb 6th, 2025

पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी माजी नगरसेविका अश्‍विनी जाधव यांनी स्वखर्चाने उपलब्ध केल्या बोअरवेल

ByMirror

Feb 5, 2025

मिसगर चाळच्या महिलांची पाण्यासाठीची भटकंती थांबणार

नगर (प्रतिनिधी)- लालटाकी, मिसगर चाळ येथील महिलांचा पाणी प्रश्‍न कायमचा सोडविण्यासाठी माजी नगरसेविका अश्‍विनी जाधव यांनी स्वखर्चाने परिसरातील नागरिकांसाठी तीन बोअरवेल उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या कामाचा शुभारंभ अश्‍विनी जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी फरजाना शेख, तब्बसुम शेख, रईसा शेख,शेरा बाजी, सोनु शेख, मुन्नी शेख, सीमा बाजी, शबनाज शेख, आयेशा खान, आलमआरा पठाण, मुमताज शेख आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


अश्‍विनी जाधव म्हणाल्या की, प्रभाग क्रमांक 10 मधील विविध नागरी प्रश्‍न सोडविण्याचे काम करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त करुन प्रभागातील विकास कामे मार्गी लावण्यात आली. कामाचे नियोजन करुन प्रभागातील सर्व मुलभूत प्रश्‍नांना प्राधान्य देण्यात आले आहे. मिसगर चाळ येथील पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला असताना व तांत्रिक अडचणीमुळे पाणी प्रश्‍न सुटत नसल्याने येथील महिलांच्या डोक्यावरील हंडे कमी करण्यासाठी स्वखर्चाने बोअरवेल उपलब्ध करुन दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


मिसगर चाळ येथील पाण्याचा प्रश्‍न गंभीर असताना महिलांना उन्हाळ्यात लांबवरुन डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागत होते. महिलांची पाण्यासाठी असलेली भटकंती अश्‍विनी जाधव यांच्यामुळे थांबणार असल्याचे व्यक्त करुन उपस्थित महिलांनी त्यांचे आभार मानले. जिव्हाळ्याचा पाणी प्रश्‍न सोडविल्याबद्दल त्यांचा महिलांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *