माती विभागात 74 किलो वजन गटामध्ये केली कामगिरी
नगर (प्रतिनिधी)- पिंपळगाव वाघा (ता. नगर) येथील पै. सौरभ पोपट शिंदे या मल्लाने अहिल्यानगर येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माती विभागात 74 किलो वजन गटा मध्ये कास्यपदक पटकाविले. पै. शिंदे याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन नगर जिल्ह्यासाठी पदक मिळवून दिले.
पै. सौरभ शिंदे सध्या गुरु हनुमान कुस्ती संकुल अंबिलवाडी येथे पै. विकास सासवडे व पै. सखाराम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. या यशाबद्दल त्याचे नगर तालुका तालीम सेवा संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, सचिव पै. बाळू भापकर, तुकाराम वाबळे, दत्ता नाट, गुलाब केदार, बबन शेळके, सुखदेव जाधव, उद्योजक अरुण फलके, गोकुळ जाधव, वस्ताद भानुदास ठोकळ, उपाध्यक्ष संदिप डोंगरे आदींनी अभिनंदन केले.