जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने झालेल्या सन्मानाचे ग्रामस्थांच्या वतीने कौतुक
गावातील विविध सामाजिक चळवळीत पै. नाना डोंगरे यांचा सातत्याने सहभाग -लताबाई फलके
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) ग्रामपंचायतच्या वतीने लोकसभा, विधानसभा निवडणूकीत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबवून केलेल्या कार्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. नुकतेच जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने देखील डोंगरे यांचे जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते मतदार जागृतीसाठी केलेल्या कार्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, याबद्दल डोंगरे यांचा गावात ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार सोहळा पार पडला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात पै. नाना डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच लताबाई फलके, अरुण फलके, उद्योजक राजेंद्र शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी गोवर्धन राठोड, उपसरपंच प्रमोद जाधव, श्रीमती सुमन कुरेल, ग्रामपंचायत सदस्य मुन्नाबी शेख, दिपक गायकवाड, उज्वला कापसे, किरण जाधव, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, मुख्याध्यापिका नलिनी भुजबळ, गोरख फलके, साहेबराव बोडखे, कचरु कापसे, अण्णा जाधव, जालिंदर आतकर, अतुल फलके, अरुण कापसे, सचिन जाधव, मयुर काळे, चंद्रकांत पवार, भाऊराव जाधव, अजय ठाणगे, अरुण काळे, भाऊराव जाधव आदी उपस्थित होते.
सरपंच लताबाई फलके म्हणाल्या की, गावातील विविध सामाजिक चळवळीत पै. नाना डोंगरे यांचा सातत्याने सहभाग असतो. विविध पुरस्काराच्या माध्यमातून त्यांनी गावाचे नाव उंचावले आहे. जिल्हा निवडणुक शाखेच्या वतीने त्यांचा नुकताच मतदार जागृतीच्या कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. गावात देखील त्यांनी केलेली मतदार जागृती कौतुकास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजेंद्र शिंदे म्हणाले की, मतदानाची टक्केवारी वाढल्यास लोकशाही बळकट होणार आहे. त्या दृष्टीकोनाने गाव पातळीवर पै. नाना डोंगरे यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. विविध क्षेत्रात डोंगरे सामाजिक योगदान देत असून, त्यांच्या माध्यमातून गावातील युवकांना दिशा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना पै. नाना डोंगरे यांनी गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य व नवनाथ विद्यालयाचे मतदार जागृतीसाठी विशेष सहकार्य लाभले. गावात शंभर टक्के मतदान होण्यासाठी भविष्यात प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.