युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; डेड लिफ्ट, स्कॉट, पुलप्स, बेंच प्रेस मधून शक्तीप्रदर्शन
नगर (प्रतिनिधी)- निरोगी आरोग्य व व्यसनमुक्तीचा संदेश देत युवकांसाठी केडगावात फिटनेस स्पर्धा रंगली होती. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एसपी फिटनेस व एसपी न्यूट्रिशन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. युवकांनी डेड लिफ्ट, स्कॉट, पुलप्स, बेंच प्रेस प्रकारात शक्तीचे प्रदर्शन घडविले.
या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून एकनाथ वाघमारे, अजय गायकवाड, श्रावण पारधे, डॉ. श्रीधर गादेवार, वानखेडे सर उपस्थित होते. या मधील विजयी स्पर्धकांना चषक, प्रमाणपत्र प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. अजय गायकवाड यांनी आजची युवा पिढी व्यसनाच्या आहारी जात असताना युवकांना आरोग्याचा कानमंत्र देण्यासाठी घेण्यात आलेली स्पर्धा प्रेरणादायी आहे. व्यायामाद्वारे सदृढ व निरोगी समाज होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या स्पर्धेत डेड लिफ्ट प्रथम- आदित्य चाकणे, द्वितीय- शुभम करपे, तृतीय- अभिषेक थोरात, स्कॉट प्रथम- ईशान आजबे, द्वितीय- ओंकार पोटे, तृतीय- जयदेव नन्नवरे, पुलप्स प्रथम- प्रमोद डोंगरे, द्वितीय- सोहम कोतकर, तृतीय- आशिष भोर, बेंच प्रेस प्रथम- किशोर शिंदे, द्वितीय- शुभम कर्पे, तृतीय- यश बोरुडे यांनी बक्षिसे पटकाविली.
सर्व खेळाडूंना एसपी फिटनेस कोच सचिन पारधे, सिद्धार्थ पारधे, राहुल पारधे, अभिजीत पारधे यांचे मार्गदर्शन लाभले. एसपी फिटनेसचे संचालक श्रावण पारधे यांनी सर्व विजेत्या युवकांचे अभिनंदन केले.