• Wed. Feb 5th, 2025

निमगाव वाघात आठव्या काव्य संमेलनाचे आयोजन

ByMirror

Jan 26, 2025

छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज जयंतीचा उपक्रम

पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

नगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे आठव्या काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने 19 फेब्रुवारी रोजी गावातील परिवार मंगल कार्यालयात हा सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन संमेलनाचे संयोजक तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी केले आहे.


या काव्य संमेलनात नवोदित कवी व नामवंत कवींचा सहभाग असणार आहे. यामध्ये कवींसह शाहीर देखील पोवाडे सादर करणार आहे. तसेच जयंती उत्सवाच्या कार्यक्रमात पाहुण्यांच्या हस्ते सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, धार्मिक, साहित्य, वैद्यकिय व पर्यावरण संवर्धनावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व सामाजिक संस्थांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. संत गाडगे महाराज शिक्षक रत्न पुरस्कार, संत गाडगे महाराज साहित्य रत्न पुरस्कार, संत गाडगे महाराज समाजरत्न पुरस्कार, संत गाडगे महाराज आदर्श सरपंच पुरस्कार, शिवछत्रपती गुणवंत शिक्षक पुरस्कार, शिवछत्रपती समाजरत्न पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या पुरस्कारांसाठी 5 फेब्रुवारी पर्यंत प्रस्ताव पाठवायचे आहे. प्रस्ताव पाठविण्यासाठी संस्थेचे कार्यालय पै. नाना डोंगरे, अध्यक्ष स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, निमगाव वाघा ता. जि. अहिल्यानगर 414005 या पत्त्यावर पाठवावे व अधिक माहितीसाठी 9226735346; 8605775261 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *