• Wed. Feb 5th, 2025

युनियन बँक राशीन शाखेच्या मनमानी कारभार विरोधात बहुजन समाज पार्टीचे उपोषण

ByMirror

Jan 23, 2025

त्या अधिकाऱ्याची बदली करण्याची मागणी; बँकेच्या विरोधात आंदोलन केल्याने बँकेत येण्यापासून रोखल्याचा आरोप

नगर (प्रतिनिधी)- युनियन बँक राशीन शाखेतील मनमानी कारभाराच्या विरोधात बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्यात आले. तर बँकेच्या कारभाराविरोधात आवाज उठविणाऱ्या खातेधारकास बँकेत येण्यापासून मज्जाव करणाऱ्या त्या अधिकाऱ्याची बदली करण्याची मागणी करण्यात आली. बदली होत नाही, तो पर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.


या उपोषणात बसपाचे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ, विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब काते, जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, जिल्हा महासचिव मेजर राजू शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख, विधानसभा प्रभारी गणेश बागल, शहराध्यक्ष फिरोज शेख पत्रेवाला, नगर विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब काते, दत्तात्रय सोनवणे, सलीम अत्तार, गंगासागर सोनवणे, राजू साळवे, सूर्यकांत सोनवणे, सोमनाथ सोनवणे, अमोल वाघमोडे, सागर मदने, देविदास ढवळे, सुनील मदने, आनंद कांबळे, तुषार पंडित, दीपक मदने, कचरू लष्करे, दत्तू गिरी, रामा लष्करे, संतोष मोरे, मनीषा जाधव, अजीत यादव आदी सहभागी झाले होते.


युनियन बँकेच्या राशीन शाखेतील मनमानी कामकाजाला कंटाळून व विविध प्रश्‍नांविषयी डिसेंबर मध्ये दत्तात्रय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आले होते. यावर शाखा अधिकारी यांनी खुलासा पत्र देऊन उपोषण थांबविले होते. पत्रात दिल्याप्रमाणे अद्यापि कोणत्याही आश्‍वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही. यामुळे खातेधारक असलेल्या नागरिकांना समस्या व अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बँकेतील कर्मचारी दिवसा मद्यपान करुन सेवेत हजर असतात. त्यांच्या विरोधात आंदोलन केल्याचा राग धरुन वारंवार शाखा अधिकारी तसेच त्यांच्या सहकारी वर्गाने धमकावून उडवाउडवीचे उत्तरे देण्यास सुरुवात केली असल्याचा आरोप आंदोलक सोनवणे यांनी केला आहे.
बँकेचे खातेधारक असलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्‍न न सोडविता मनमानी कार्य करणाऱ्या शाखेतील अधिकाऱ्यावर कारवाई करुन त्याची बदली करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा रिजनल ऑफिस समोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *