ज्यांना गोरगरिबांच्या पैश्याची जाण असते, तो कधीच मागे राहत नाही -खासदार निलेश लंके
नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील सुपा येथील सुपा हाईट्स इमारतीमध्ये नुकतेच इन्फनाइट मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या शाखेचा शुभारंभ मोठ्या दिमाखात पार पाडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार निलेश लंके, डीवायएसपी संपतराव भोसले, मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन नवनाथ औताडे, आदींसह अनेक सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चेअरमन नवनाथ औताडे म्हणाले की, गेल्या सहा वर्षांपूर्वी मी व माझ्या सहकाऱ्यांनी इन्फनाइट मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह नावाचे एक रोपटे लावले होते. आता हे रोपटे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. जिल्ह्यात श्रीगोंदा येथे काही दिवसांपूर्वी याची शाखा सुरू केली असून, सुपा येथे ही दुसरी शाखा सुरू करण्यात आलेली आहे. तालुक्यात सहकारी पतसंस्था बाबत काय अवस्था झाली? ही सर्वांना माहित आहे.
अनेक पतसंस्था डबघाईला आलेल्या असताना, आपण या वादळात दिवा लावण्याचे काम करत आहोत. ज्या ठिकाणी आम्ही पाय रोवला त्या ठिकाणी ताठ उभे राहून एक आदर्शवत काम सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून केले जात आहे. काही समाज विघातक कृत्य करणारे मंडळी ना असे वाटते की आम्ही कधी तरी बुडू पण मी त्यानं नम्र पणे सांगू इच्छितो की तुमचे स्वप्न हे स्वप्न च राहील. भविष्यात 15 ते 20 वर्षानंतर या मल्टीस्टेटचा आदर्श सर्वांसमोर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार निलेश लंके म्हणाले की, नवनाथ अवताडे यांनी जे रोपटे लावले त्या रोपट्याला फुलवायचे काम विनोद गाडीलकर व त्यांच्या सहकार्यांनी केले. गोरगरिबांच्या घामाचे पैसे आपण ठेवतो, याची जाण ज्याच्याकडे असते तो कधीच मागे राहत नाही. सकाळी उठल्यावर कॅलेंडर पाहिले, आज कोणताही कार्यक्रम दिसला नाही. परंतु येथे आल्यावर समजले की विनोद गाडीकर यांच्या वाढदिवसानिमित्त हा उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला आहे. यावेळी गाडीलकर यांच्या कार्याचे खासदार लंके यांनी कौतुक केले.
डीवायएसपी संपतराव भोसले म्हणाले की, मल्टीस्टेट मध्ये सर्वसामान्य, गोरगरीब, कष्टकरी वर्गाचा पैसा आहे. त्याला काळजीपूर्वक जपले पाहिजे. कारण त्या पैश्यावरच सर्वसामान्यांचे आयुष्य अवलंबून असते. सर्वसामान्य नागरिकांना दोन पैसे मिळतील व त्याचा फायदा होईल, या हेतूने सर्वांना विश्वासात घेऊन काम करावे, असे सांगून त्यांनी सोसायटीच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन सुरु असलेल्या कार्याचे कौतुक केले. यावेळी पुणे, दौंड, श्रीगोंदा, नगर जिल्ह्यातील संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. जर कोणी चुकीची माहिती व सोशल मीडियाद्वारे प्रसारित करत असेल, तर त्या अफवांवर विश्वास ठेवू नये. काही शंका असल्यास कार्यालयाशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.