शालेय विद्यार्थ्यांचे तपासण्यात आले रक्त गट
वाडी-वस्तीवर आरोग्य सुविधा देण्याचे उमेदचे काम कौतुकास्पद -शिवाजी कपाळे
नगर (प्रतिनिधी)- उमेद सोशल फाउंडेशनच्या वतीने मल्हारवाडी (ता. राहुरी) येथे मोफत स्त्री रोग तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरास पंचक्रोशीतील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. तर शालेय विद्यार्थ्यांची रक्त गट तपासणी करण्यात आली. साईधाम हॉस्पिटल यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला होता.
उमेद सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे आणि उपाध्यक्ष कुणाल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या शिबिराप्रसंगी डॉ. स्वप्निल माने, मल्हारवाडी गावचे सरपंच मंगेश गाडे, साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी कपाळे, व्हेरा सिटी फाऊंडेशनच्या अध्यक्षा ज्योती सोनीग्रा, बी.डी. माने, अंश फाउंडेशनच्या अश्विनी झेंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शिवाजी कपाळे म्हणाले की, ग्रामीण भागातील महिलांना विविध तपासण्यासाठी शहरात जावे लागते. या खर्चिक गोष्टी व वेळ अभावी त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. महिलांच्या आरोग्यासाठी त्यांना वाडी-वस्तीवर आरोग्य सुविधा देण्याचे काम उमेद सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सुरु आहे. त्याचप्रकारे विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक सोयी-सुविधा निर्माण करुन देण्यासाठी फाऊंडेशनचे सुरु असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
अनिल साळवे यांनी समाजातील शेवटच्या घटकांना आधार देण्यासाठी उमेद सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने कार्य सुरु आहे. गरजू घटकांना आरोग्य, शिक्षण व मुलभूत सुविधा निर्माण करुन देण्यासाठी संस्था प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्याधन प्री प्रायमरी स्कूल मध्ये विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली. तर मल्हारवाडी जिल्हा परिषद शाळेत स्त्री रोग तपासणी घेण्यात आली. डॉ. स्वप्निल माने यांनी महिलांना निरोगी आरोग्यासाठी मार्गदर्शन केले. तर उमेदच्या समाजकार्यासाठी नेहमीच सहकार्य राहणार असल्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश मंचरे यांनी केले. या कार्यक्रमास दीपक ढवळे, अनिता गोत्रीस, विद्याधन स्कूलचे मुख्याध्यापक शेखर लहारे, उपप्राचार्य रणजीत लहारे, अश्विनी गाडे, उमेद फाउंडेशनचे सचिव सचिन साळवी, खजिनदार संजय निर्मळ, सदस्य नुरिल भोसले, विजय लोंढे, रवी साखरे, सोमनाथ धोंडे, कैलास कलापुरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कुलट, प्रियंका पोपळघट आदींसह ग्रामस्थ, महिला व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक कार्यासाठी तालुकास्तरावर उमेद सोशल फाउंडेशनच्या शाखा होणार आहे. या पार्श्वभूमीवर राहुरी फॅक्टरी येथे उमेद सोशल फाउंडेशनच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाखाप्रमुखपदी कुणाल तनपुरे, कार्यकारी अधिकारी म्हणून राजेश मंचरे, संघटकपदी श्रीकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब सगळगिळे व शाखा सल्लागारपदी गोपाळ शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.