आरोग्य व पर्यावरण संवर्धन चळवळीला पत्रकारांनी पाठबळ दिले -संजय सपकाळ
नगर (प्रतिनिधी)- आरोग्य व पर्यावरण संवर्धन चळवळीला पत्रकारांनी पाठबळ दिले. हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून मागील चोवीस वर्षापासून आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालवली जात असून, या कार्याला मिळलेल्या प्रसिध्दीमुळे हे कार्य मोठे झाले आहे. तर मोठ्या संख्येने सदस्य या चळवळीशी जोडले गेलेले आहे. सामाजिक परिवर्तनासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची राहिली असल्याचे प्रतिपादन हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांनी केले.
पत्रकार दिनानिमित्त अहिल्यानगर मधील पत्रकारांच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सपकाळ बोलत होते. याप्रसंगी हरदिनचे रमेशराव वराडे, मेजर दिलीप ठोकळ, जहीर सय्यद, सचिनशेठ चोपडा, अभिजीत सपकाळ, रतनशेठ मेहेत्रे, अविनाश जाधव, सुधीर कपाळे, सर्वेश सपकाळ, जालिंदर बोरुडे आदींसह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ पत्रकार तथा डिजिटल मिडीया तज्ञ संतोष धायबर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, जेष्ठ पत्रकार रामदास ढमाले, अशोक सोनवणे, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख आदींसह कार्यक्रमास उपस्थित असलेले वृत्तपंत्रांचे संपादक, पत्रकार, माध्यमांचे प्रतिनिधी, वृत्तछायाचित्रकारांचा हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला.