• Wed. Oct 15th, 2025

रविवारी शहरात राज्यस्तरीय चर्मकार समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

ByMirror

Dec 31, 2024

समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन

राज्यातील चर्मकार समाज एकवटणार

नगर (प्रतिनिधी)- चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने शहरात राज्यस्तरीय चर्मकार समाजाचे वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि.5 जानेवारी) रोजी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत हा मेळावा होणार असून, या मेळाव्यात सर्व समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे, वधू-वर मंडळाध्यक्ष अश्रूजी लोकरे, केंद्रप्रमुख बापूसाहेब देवरे यांनी केले आहे.


या मेळाव्यासाठी आमदार संग्राम जगताप, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार हेमंत उगले, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, लहू कानडे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, कॉ. स्मिताताई पानसरे, संपतराव बारस्कर, माजी नगरसेवक आशोक कानडे, डॉ. सागर बोरुडे, उद्योजक अंकुशराव कानडे, नितीन उदमले, सुनील त्र्यंबके, तुकाराम शेंडे, डॉ. रावसाहेब बोरुडे, अजित रोकडे, आर्किटेक्चर कल्याण सोनवणे, विश्‍वनाथ निर्वाण, भास्करराव जाधव, उद्योजक रामदास उदमले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.


चर्मकार संघर्ष समितीच्या माध्यमातून सातत्याने समाजकार्य सुरु आहे. दरवर्षी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करुन समाजातील मुला-मुलींचे लग्न जमविण्याचे काम केले जात आहे. तर या कार्यक्रमानिमित्त राज्यातील चर्मकार समाज बांधव एकत्र येत आहे. चर्मकार समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात सातत्याने संघटनेच्या माध्यमातून आवाज उठविण्यात आला आहे. तर समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे.

संघटनेने गटई कामगारांना आंदोलनाच्या माध्यमातून पीच परवाने मिळवून दिले आहे. संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या विचाराने व महापुरुषांच्या समतेच्या मुल्यांवर संघटना कार्यरत आहे. समाजातील गुणवंताचा सन्मान, चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळातील विविध प्रश्‍न सोडविणे व महिलांच्या विविध प्रश्‍न सोडविण्याचे कार्य सुरु असल्याचे शिवाजी साळवे यांनी म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *