पुष्पलता जाधव ठरल्या मोपेड बाईकच्या विजेत्या
21 भाग्यवान विजेत्यांना सोन्याची नथ, पैठणी साड्या व चांदीचे नाणे बक्षीसे प्रदान
नगर (प्रतिनिधी)- नवनागापूर एमआयडीसी येथील दहिवाळ सराफ खरवंडीकर दालनात दिवाळी व पाडव्यानिमित्त ग्राहकांसाठी बक्षीसांची लयलूट ऑफर ठेवण्यात आली होती. या योजनेनिमित्त सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या कुपनची सोडत काढण्यात आली. यामध्ये गुलमोहर रोड येथील पुष्पलता महादेव जाधव मोपेड बाईकचे भाग्यवान विजेत्या ठरल्या. तर सोडत मधील 21 भाग्यवान विजेत्यांना सोन्याची नथ, पैठणी साड्या व चांदीचे नाणे बक्षीसे देण्यात आले.
दिवाळी व पाडव्यानिमित्त दहिवाळ सराफ खरवंडीकर दालनात दहा हजार रुपये पुढील खरेदीवर ग्राहकांना लकी ड्रॉ कुपन देण्यात आले होते. या जमा झालेल्या कुपनची सोडत नुकतीच काढून भाग्यवान विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. यावेळी ह.भ.प. माळवदे महाराज, नवनाथ दहिवाळ, सचिन दहिवाळ, नितीन दहिवाळ, अरुणा दहिवाळ, शितल दहिवाळ, पूजा दहिवाळ, साईराज दहिवाळ, स्वरा दहिवाळ, ओवी दहिवाळ, देवांश दहिवाळ, शंभू दहिवाळ, संतोषी भिसे, प्रिया मद्दा, रिजवाना बागवान, शितल कानडे, दिपाली बंगाळ, साक्षी पवार, प्रिया गवांदे, बंडू भिसे आदींसह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
भाग्यवान विजेते ठरलेले सार्थक बाबासाहेब कदम, शैलेश शिंदे यांना सोन्याची नथ, चंदा तुपे, तुषार दौंड यांना पैठणी साड्या तर पदम झुंबर, झांजे या विजेत्यांना चांदीचे नाणे बक्षीस स्वरुपात देण्यात आले. यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या, यामधील विजेत्यांना देखील आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
दहिवाळ सराफ खरवंडीकर यांचे नवनागापूर (रेणुका स्कूल जवळ), पाईपलाइन रोड (यशोदा नगर कमानी समोर), खरवंडी (ता. पाथर्डी) व धनकवडी (जि. पुणे) येथे चार शाखा कार्यरत आहे. या चारही शाखेमध्ये महिला दिन व विविध सण-उत्सव काळात खरेदीवर विविध ऑफर ठेवण्यात येते. तसेच इतर उपक्रम देखील राबवून सोन्या चांदीच्या खरेदीवर विविध भेटवस्तू दिल्या जातात. दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या दालनात सर्व प्रकारचे आकर्षक डिजाईनचे सोन्याचे दागिने, टेम्पल ज्वेलरी, कास्टिंग ज्वेलरी, सर्व स्टोन ज्वेलरी, राशीचे खडे, हिऱ्यांचे दागिने उपलब्ध आहेत. दागिन्यांच्या घडणवळणीवर सर्वात कमी मजुरी असलेले हे दालन असून, सर्व शाखांमध्ये हॉलमार्क प्रमाणे बिगर घटीचे दागिने उपलब्ध आहेत. 1978 पासून शाखा कार्यरत असून, ग्राहकांमध्ये एक विश्वास निर्माण करण्यात आला असल्याचे दहिवाळ बंधूंनी सांगितले आहे.