सेलिब्रेशनसह चित्रपटाचा आनंद कौटुंबिक पध्दतीने घेण्याची पर्वणी
मोठ्या चित्रपट गृहांना पर्याय म्हणून मिनी थेटर ही संकल्पना नगरकरांच्या पसंतीस उतरणार -सचिन जगताप
नगर (प्रतिनिधी)- शहरातील नागरिकांना चित्रपटासह लहान-मोठे सेलिब्रेशन करण्याच्या उद्देशाने धर्माधिकारी मळा, पंपिंग स्टेशन येथे नव्याने उभारण्यात आलेल्या राजस्व थेटर ॲण्ड रेस्टॉरंटचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांच्या हस्ते झाला. शहरात सेलिब्रेशनसह चित्रपटाचा आनंद कौटुंबिक पध्दतीने नगरकरांना घेता येणार आहे.
सचिन जगताप म्हणाले की, मोठ-मोठ्या चित्रपट गृहांना पर्याय म्हणून मिनी थेटर ही संकल्पना नगरकरांच्या पसंतीस उतरणार आहे. जास्त गर्दी न राहता कुटुंबाला एकत्रितपणे चित्रपट पाहता येणार आहे. तर व्हेज रेस्टॉरंटचा देखील आस्वाद मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, नागरिकांना लहान-मोठे सेलिब्रेशन चित्रपटासह साजरे करता येणार आहे. धकाधकीच्या जीवनात जीवनाचा आनंद घेण्यासाठी असे मिनी थेटर आनंदाची पर्वणी ठरणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
उद्योजक हनुमंत भुतकर, राहुल पाटोळे, चेतन शहाणे व सोमनाथ पेटकर यांनी राजस्व थेटर ॲण्ड रेस्टॉरंटची निर्मिती करुन नगरकरांसाठी मनोरंजनाची संधी उपलब्ध करुन दिली आहे.
कमी दरात नागरिकांना चित्रपट पाहता येणार आहे. तर कुटुंबासह चित्रपट आणि रेस्टॉरंटमध्ये वाढदिवस व इतर कौटुंबिक पध्दतीने पार्ट्यांचे सेलिब्रेशन होणार असल्याची माहिती राजस्व ग्रुपच्या वतीने देण्यात आली. या उद्घाटन सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.