सीआरएस नोंदणी करुन सहभागी होण्याचे आवाहन
नगर (प्रतिनिधी)- शहरातील अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने मंगळवार (दि.26 नोव्हेंबर) पासून महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर गर्ल्स स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणीला प्रारंभ झाले आहे. या निवड चाचणीसाठी सीआरएस नोंदणी करुन जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव रोनप फर्नांडिस यांनी केले आहे.

8 ते 12 डिसेंबर 2024 दरम्यान जळगाव येथे होणाऱ्या वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आयोजित ज्युनिअर गर्ल्स स्टेट चॅम्पियनशिप 2024 साठी जिल्हा संघाची निवड चाचणी व सराव शिबिर अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटनेमार्फत होत आहे. 1 जानेवारी 2009 ते 31 डिसेंबर 2011 यादरम्यान जन्मतारीख असलेल्या खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. सर्व सहभागी खेळाडूंना ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे नियमानुसार सीआरएस नोंदणी अनिवार्य करण्यात आहे. या निवड चाचणीमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूंनी आधार कार्ड (सत्यप्रत) व जन्म दाखला (सत्यप्रत) आणि पासपोर्ट साईज फोटो ही कागदपत्रे सोबत घेऊन येणे आवश्यक असल्याचे म्हंटले आहे.