मतदानासाठी विद्यार्थ्यांनी कुटुंबातील सदस्यांकडून भरुन घेतले संकल्प पत्र
भावी पिढीत सदृढ लोकशाहीचे मुल्य रुजले पाहिजे -नाना डोंगरे
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे बालदिन मतदार जागृतीने साजरा करण्यात आला. स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, साईश्रध्दा फाऊंडेशन, नवनाथ विद्यालय, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांकडून आई-वडिल आणि घरातील प्रौढ व्यक्तींना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठीचे संकल्प पत्र भरुन घेण्यात आले.
नवनाथ विद्यालयात प्रारंभी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे, बाळासाहेब कोतकर, साईश्रध्दा फाऊंडेशनच्या अध्यक्ष अर्चना परकाळे, मंदा साळवे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे-खोडदे, तृप्ती वाघमारे, प्रमोद थिटे, तेजस केदारी, अमोल वाबळे, प्रियंका डोंगरे-ठाणगे, मयुरी जाधव, भानुदास लंगोटे, राम जाधव, लहानू जाधव आदी उपस्थित होते.

पै. नाना डोंगरे म्हणाले की, भावी पिढीत सदृढ लोकशाहीचे मुल्य रुजले पाहिजे. बालकांनी आपल्या कुटुंबातील प्रत्येक प्रौढ व्यक्तींना आपल्या भविष्यासाठी चांगल्या उमेदवारांना मतदान करण्याचा आग्रह धरला पाहिजे. मुलांमध्ये लोकशाहीचे मुल्य रुजल्यास सक्षम भारत घडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तम कांडेकर म्हणाले की, मतदानाची टक्केवारी वाढल्यास लोकशाही पध्दतीने चांगले उमेदवार निवडून येण्यास मदत होणार आहे. यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजाविणे आवश्यक आहे. चांगले उमेदवार निवडून आल्यास विकास कामे होऊन विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. बाळासाहेब कोतकर यांनी मुलांनी पुढाकार घेऊन घरोघरी मतदारासाठी आग्रह धरल्यास मतदानाची टक्केवारी निश्चित वाढणार आहे. लोकशाहीच्या प्रक्रियेत लहान मुलांपासून ज्येष्ठांचा सहभाग मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी सिध्दाराम सालीमठ, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी संकल्प शुक्ला, उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणुक अधिकारी राहुल पाटील, शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे, जिल्हा शिक्षणाधिकारी अशोक कडूस, प्र. जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर, लेखापाल सिध्दार्थ चव्हाण, रमेश गाडगे, मतदारदूत अमोल बागुल यांचे मार्गदर्शन लाभले.