• Wed. Oct 29th, 2025

भिंगार शहरात शितलताई जगताप यांनी घरोघरी जाऊन घेतल्या महिलांच्या गाठी-भेटी

ByMirror

Nov 13, 2024

विकासाचा रथ पुढे घेऊन जाण्यासाठी सर्व महिला वर्ग आ. जगताप वर्ग यांच्या पाठिशी -सविता पवार

नगर (प्रतिनिधी)- शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ त्यांच्या सुविद्य पत्नी शितलताई जगताप यांनी भिंगार शहरात घरोघरी भेटी देऊन महिलांच्या गाठी-भेटी घेतल्या. ठिकठिकाणी बैठका घेऊन त्या महिलांना आ. जगताप यांना मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आवाहन करत आहेत.
भिंगार येथे महिलांच्या भेटीसाठी आलेल्या सौ. जगताप यांचे सविता मारूती पवार यांनी स्वागत करुन सर्व महिलांच्या वतीने आ. जगताप यांना पाठिंबा दर्शविला. यावेळी शीतल भुजबळ, आकांक्षा पवार, संगीता शेरकर, छाया राहिंज, पूजा सिंग, निर्मला पांढरे, ज्योती घुसाळे, जया राहिंज, भुजबळ ताई, पूजा ताठे, कमल बहिरट, मंगल शिंदे आदींसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


सविता पवार म्हणाल्या की, भिंगारकरांना विकासाची दिशा आ. संग्राम जगताप यांनी दाखवली. छावणी परिषदेकडून निधी मिळत नसताना, आमदार निधीतून त्यांनी अनेक विकासात्मक कामे मार्गी लावली. विकास कामे करताना त्यांनी कोणत्याही प्रकारे राजकारण न करता फक्त विकासाच्या ध्येय धोरणाने कामे केली. त्यांच्या विकासाचा रथ पुढे घेऊन जाण्यासाठी सर्व महिला वर्ग त्यांच्या पाठिशी असणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


शितलताई जगताप म्हणाल्या की, शहरासह उपनगर भागातील परिसराचा कायापालट करण्याचे काम आ. संग्राम जगताप यांनी केले. विकासाचे व्हिजन ठेऊन शहर, उपनगरात काम सुरु आहे. या विकासाला गती देण्यासाठी जनतेने त्यांना पुन्हा संधी देण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *