• Wed. Jul 2nd, 2025

शहर विकासासाठी आ.संग्राम जगतापांचे रेणुकामातेला साकडे

ByMirror

Nov 13, 2024

केडगावच्या नागरिकांचा प्रचार फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद

वाजिद शेख नगर (प्रतिनिधी)- गेल्या दहा वर्षांपासून केलेल्या कामांनी नगरकरांची सेवा केली आहे. अशीच सेवा माझ्या हातून भविष्यातही घडावी यासाठी रेणुका माते मला शहर विकासासठी सामर्थ्य दे, असे साकडे महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांनी केडगावच्या कुलस्वामिनी रेणुका मातेच्या चरणी केली.

शहर व केडगाव उपनगर मधील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जी कामे केली त्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाने केलेल्या कामाचे चीज झाल्याचे समाधान मला आज केडगावकरांनी दिले आहे. यापुढील काळातही अशीच सेवा करण्याची संधी मिळावी अशी प्रार्थनाही आ. जगताप यांनी रेणुका माता चरणी केली.

ॲपे रिक्षामध्ये बसून केला प्रचार

विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांनी केडगावच्या रेणुका माता देवी मंदिरात दर्शन घेतले. प्रभाग १७ मधील परिसरात प्रचार फेरी काढून आ.जगताप यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी माजी नगरसेवक मनोज कोतकर, सुनील कोतकर, जालिंदर कोतकर, पोपट कराळे, संजय लोंढे, मनोज कराळे, राजेश भालेराव, महेश गुंड, संभाजी सातपुते, साहेबराव विधाते, धनंजय जामगावकर, पंकज जहागीरदार, राजेंद्र सातपुते, गणेश नन्नवरे, राहुल कांबळे, सुरज कोतकरआदींसह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते. ठिकठिकाणी आ.जगताप यांचे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.

थेट विट भट्टी गाठून कामगारांशी साधला संवाद.

यावेळी माजी नगरसेवक जालिंदर कोतकर म्हणाले, आ.संग्राम जगताप यांनी केडगावचे मुलभूत प्रश्न सोडवण्याबरोबरच केडगावचे सर्व मुख्य रस्ता, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम, ड्रेनेज लाईन, पथदिवे, नियमित पाणीपुरवठा आदी प्रमुख कामे मार्गी लावली आहेत. तसेच केडगावमध्ये उद्याने, खेळाची मैदाने, मंदिराचे सुशोभीकरण, युवकांच्या रोजगारीचा प्रश्न संग्राम जगताप यांच्या विकास कार्यातून सुटल्यामुळे केडगाव मधील नागरिक सुखाने रहात आहेत. याशिवाय नागरिकांच्या संकट काळत संग्राम जगताप हे २४ तास उपलब्ध असल्याने ते केडगावच्या नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. त्यामुळे या निवडणुकीत केडगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने संग्राम जगताप यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मतदान करून बहुमताने निवडून आणतील यात शंकाच नाही.

या परिसरातील अमित नगर, ताराबाग कॉलनी, एकता कॉलनी, चिपाडे मळा भागात प्रचारा दरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी फटाकाच्या अतिषबाजीत जगताप यांचे स्वागत केले. यावेळी रोहित कोतकर, सुमित लोंढे, सोन्याबापु घेबुड, संकेत वाघमारे, सुहास साळुंखे, बच्चन कोतकर, वैभव कदम, विजय सुंबे, चंद्रकांत पाटोळे, पोपट कराळे, सुजय मोहिते, माऊली जाधव, जितू गायकवाड, सचिन माथाडे, कृष्णा लांडे, अतुल मकासरे, दीपा भंडारी, सौ मनीषा बाविस्कर, सौ शितल नन्नवरे, लाटे काकू, सौ चव्हाण यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रचार फेरीत आशा निंबाळकर, अरुणा गोयल, सुजाता कदम, संगीता ससे, लता पठारे, मनोज नन्नवरे, अक्षय कांबळे, दत्ता खैरे, शरद ठूबे, सुमित लोंढे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *