युवतींना मिळणार ब्युटी पार्लर कोर्सचे प्रशिक्षण
विद्यार्थ्यांच्या भवितव्याला दिशा देणारे प्रशिक्षण -रामचंद्र दरे
नगर (प्रतिनिधी)- न्यू आर्टस, कॉमर्स ॲण्ड सायन्स कनिष्ठ महाविद्यालयात पोलीस व आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग व मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गाला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे व सचिव ॲड विश्वासराव आठरे पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. कल्पना दारकुंडे, पर्यवेक्षक प्रा. सुभाष गोरे, क्रीडा संचालक प्रा. आकाश नढे, ब्युटीशियन प्रमुख प्रा. प्राजक्ता भंडारी, प्रा. दिपाली सातपुते, समन्वयक प्रा. सुनंदा कर्पे आदी उपस्थित होते.
रामचंद्र दरे म्हणाले की, हे प्रशिक्षण वर्ग महाविद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांच्या भवितव्याला दिशा देणारे ठरणार आहे. विद्यार्थ्यांना पोलीस व आर्मी मध्ये जाण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच कौशल्य विकास केंद्राच्या वतीने विद्यार्थिनींना मोफत ब्युटी पार्लर कोर्सचे प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यात आले असून, या माध्यमातून युवतींना स्वयंरोजगार उपलब्ध होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तर अशा प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र जाधव यांनी. आभार पर्यवेक्षक प्रा. सुभाष गोरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. दत्तात्रय आहेर, प्रा.चंद्रकांत फसले, प्रा. किरण वाघमोडे आदी सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.