कुलबुर्गी न्यायालयाचा आदेश
नगर (प्रतिनिधी)- अपहरण व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कर्नाटकमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात शहरातील पाच जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. नुकतेच कुलबुर्गी न्यायालयाने आदेश दिले आहेत.
दोन वर्षापूर्वी अपहरण व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी नगरसेवक स्वप्निल शिंदे, विकी उर्फ विकास खरात, शाहरुख शेख, अभिजीत कुलाख व अक्षय इकडे या पाच जणांवर शहाबाद (जि. कुलबुर्गी, कर्नाटक) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी पोलीसांनी दोषारोपत्र दाखल करुन, या खटल्याची सुनावणी कुलबुर्गी न्यायालयात झाली. त्यावर न्यायालयाने नगरच्या पाच आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले.