महेक शेख हिने पटकाविले द्वितीय क्रमांक
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील म. अल्ताफ इब्राहिम माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी महेक अल्ताफ शेख हिने तालुकास्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला.
नागोरी मुस्लिम मिसगर जमाअत ट्रस्ट संचलित अहमदनगर उर्दू प्राथमिक शाळा, अहमदनगर उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी भाषा दिनानिमित्त तालुकास्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा पार पडली. इयत्ता नऊवीची विद्यार्थिनी असलेली महेक शेख हिने आधुनिक युग और हिंदी या विषयावर वक्तृत्व सादर केले होते. तिला हिंदी विषय शिक्षिका तबस्सुम शेख यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल तिचे संस्थेचे अध्यक्ष शाहिद काझी, सचिव रेहान काझी, संचालिका डॉ. अस्मा काझी, मुख्याध्यापक एजाज शेख, समिउल्ला शेख, जाविद पठाण, अर्शिया हवालदार, तबस्सुम शेख, मेहरुना शेख, निलोफर शेख, सुरेखा ससे आदींनी अभिनंदन केले.