• Wed. Jul 2nd, 2025

केडगावच्या सरस्वती शाळेतील मुलींना गुड टच बॅड टचचे समुपदेशन

ByMirror

Sep 30, 2024

भरोसा सेलचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- भरोसा सेलच्या माध्यमातून केडगाव येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेतील मुलींना गुड टच बॅड टच बद्दल समुपदेशन करण्यात आले. अल्पवयीन मुलींवर सातत्याने होणाऱ्या अत्याचारांच्या पार्श्‍वभूमीवर जागृती होण्याच्या उद्देशाने भरोसा सेल अंतर्गत निर्भया पथकच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.


या कार्यक्रमसाठी निर्भया पथक प्रमुख पोलीस निरीक्षक राजेंद्र वाघ, महिला पोलीस कॉन्स्टेबल सुलभा औटी, स्वाती ढवळे, बेद्रे सर, केडगाव येथील जीमचे डायरेक्टर कोच योगेश बिचितकर, सेल्फ डिफेन्स कोच प्रतीक्षा देशमुख, महाविद्यालयचे प्रचार्य रविंद्र चोभे, मुख्यध्यापक संदीप भोर, मुख्याध्यापिका धर्माधिकारी आदी उपस्थित होत्या.


इयत्ता 4 थी ते 12 वी पर्यंतच्या मुलींना या कार्यक्रमात गुड टच बॅड टच बद्दल माहिती देण्यात आली. तत्पूर्वी 8 दिवस स्वसंरक्षण प्रशिक्षण मुलींना देण्यात आले होते. मुलींना चांगला आणि वाईट स्पर्श यातील फरक तसेच आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगामध्ये प्रसंगवधान राखून कुणाचीही मदत मिळेपर्यंत स्वतः काय करायचे? या बद्दल माहिती देण्यात आली. तसेच आपल्याला आलेली प्रत्येक अडचण आपण घरात आई वडील किंवा शाळेत शिक्षकांना निसंकोच पणे सांगण्याचे व संकटात अडकल्यावर 112 नंबरवर कॉल करण्याचे आवाहन करण्यात आले. अडचणीमध्ये पोलीसांची मदत कशी मिळवायची? याचेही मार्गदर्शन सुलभा औटी यांनी विद्यार्थिनींना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *