• Fri. Sep 19th, 2025

मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचे शिवसेनेच्या वतीने स्वागत

ByMirror

Aug 13, 2024

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा

मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून मराठा समाजाचा प्रश्‍न लवकरच मार्गी लागणार -अनिल शिंदे

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातून सोमवारी (दि.12 ऑगस्ट) निघालेल्या मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचे शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या वतीने स्वागत करुन, मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे सुरु असलेल्या आंदोलनास जिल्हा शिवसेनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.


प्रारंभी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव, युवा सेना जिल्हाप्रमुख योगेश गलांडे, शहर प्रमुख सुनील लालबोंद्रे, युवा सेना जिल्हाप्रमुख अभिषेक भोसले, उपजिल्हाप्रमुख आनंदराव शेळके, नगरसेवक रवींद्र लालबोंद्रे, पोपट पाथरे, दामोदर भालसिंग, आशिष शिंदे, अक्षय शिंदे, ओंकार शिंदे, रोहित पाथरकर, घोरपडे मामा, दादा कांबळे, अक्षय कौडवार, महेश शिंदे, प्रथमेश भापकर, अमोल कासार, प्रणिल शिंदे आदी उपस्थित होते.


अनिल शिंदे म्हणाले की, मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या जन आंदोलनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी काही निर्णय देखील घेण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून मराठा समाजाचा प्रश्‍न लवकरच मार्गी लागणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


सचिन जाधव म्हणाले की, मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे. हीच शिवसेनेची कायम भूमिका राहिली आहे. जिल्हा शिवसेनेच्या वतीने मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *