• Wed. Oct 15th, 2025

लायन्स क्लब व लिओ क्लब ऑफ अहमदनगर यांचा पदग्रहण सोहळा पार

ByMirror

Jul 27, 2024

डॉ. अनघा पारगावकर व रिधिमा गुंदेचा यांनी स्विकारली अध्यक्षपदाची सुत्रे

लायन्सच्या माध्यमातून समाजात सत्पात्री दान -डॉ. एस.एस. दीपक

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजातील गरजूंना आधार देण्याचे काम लायन्स क्लब करत आहे. यामधील महिला देखील महिला सक्षमीकरणासाठी योगदान देत आहेत. लायन्सच्या माध्यमातून समाजात सत्पात्री दान होत असून, या सामाजिक योगदानाने समाज सावरला जात असल्याची भावना डॉ. एस.एस. दीपक यांनी व्यक्त केली.


लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व लिओ क्लब ऑफ अहमदनगर यांचा संयुक्तिक पदग्रहण सोहळा शहरात पार पडला. या पदग्रहण सोहळ्यात अध्यक्षीय भाषणात डॉ. दीपक बोलत होते. उपप्रांतपाल राजेश अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या पदग्रहण सोहळ्यात लायन्सच्या अध्यक्षपदाची डॉ. अनघा पारगावकर व लिओ क्लबच्या अध्यक्षपदाची सुत्रे रिधिमा गुंदेचा यांनी स्विकारली. या सोहळ्यासाठी किरण भंडारी, प्रशांत मनोत, अरविंद पारगावकर, आनंद बोरा, डॉ. अमित बडवे, नितीन मुनोत, सुनील छाजेड, संदेश कटारिया, कमलेश भंडारी, जस्मितसिंग वधवा, राजवीरसिंग संधू, दिलीप कुलकर्णी, प्रणिता भंडारी, सौ. सुकाळे, प्रशांत गाडेकर, ऋषी सुकाळे, वायकर, अर्चना माणकेश्‍वर, सुमित लोढा आदींसह लायन्स व लिओ क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे डॉ. दीपक म्हणाले की, सध्याची तणावपूर्ण जीवनशैली निर्माण झाली आहे. आनंदी जीवन जगणे हरवले असून, आत्महत्या वाढत आहे. आत्महत्या रोखण्यासाठी देखील सामाजिक चळवळींना कार्य करावे लागणार आहे. कोरोना काळात घर घर लंगर सेवेचे अन्नदान गरजूंना अमृत ठरले. लायन्सच्या सेवा कार्यात नेहमीच सहकार्य राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्मृती कुलकर्णी या विद्यार्थिनीने गणेश वंदना सादर केली. प्रिया बोरा व अरमान खंडेलवाल यांनी लायन्स ध्वजाला मानवंदना दिली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पाहुण्यांचे रोप देऊन स्वागत करण्यात आले. डॉ. संजय असनानी यांनी प्रास्ताविकात लायन्सचे घर घर लंगर सेवेत सुरु असलेल्या सामाजिक योगदानाची माहिती दिली. तर मागील वर्षी गरजूंसाठी उभारलेले डेंटल क्लिनिक व 111 विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सायकल वाटप करण्यात आल्याचे सांगून, सध्या शाळा सुरु झालेल्या असताना शहरासह ग्रामीण भागात स्कूल बॅगसह शैक्षणिक साहित्य वाटप सुरु असल्याचे स्पष्ट केले.


मावळते अध्यक्ष धनंजय भंडारे यांनी मागील वर्षातील कार्याचा आढावा सादर करताना घरापासून लांब असलेल्या शाळेत जाण्यासाठी मुला-मुलींना तब्बल 111 सायकल वाटप करण्यात आले. सर्वसामान्य घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याकरिता विशेष उपक्रम राबवून समाजाला गरज असलेल्या कायम स्वरुपातील प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली. लिओ क्लबच्या मावळत्या अध्यक्षा आंचल कंत्रोड व दिशा तलवार यांनी मागील वर्षातील विविध सामाजिक उपक्रमाचा आढावा घेतला.


राजेश अग्रवाल म्हणाले की, 200 पेक्षा जास्त देशात लायन्स क्लबची सामाजिक चळवळ सुरू आहे. 50 हजार क्लब असून, संपूर्ण जगात याचे सदस्य आहेत. जुलै या महिन्यात सर्व क्लबचा पदग्रहण सोहळा होत असल्याची माहिती दिली. तर लायन्स व लिओ क्लबच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्याची जबाबदारी समजावून व पदाची शपथ दिली.


डॉ. अनघा पारगावकर म्हणाल्या की, या वर्षात पर्यावरण व आरोग्यावर काम केले जाणारे आले आहे. समाजात दोन्ही प्रश्‍न बिकट बनत चालले आहे. उन्हाळ्यात होरपळून निघत असून, अनेक भागात पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होत आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या प्रश्‍नामुळे हे घडत असून, यासाठी वृक्षारोपण व संवर्धन हा एकमेव मार्ग आहे. जलस्त्रोत पुनर्जीवन व वृक्षरोपणाने पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावला जाणार आहे. प्रत्येक प्रकल्पात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनाने काम केले जाणार आहे. ग्रामीण भागातील शाळा दत्तक घेऊन तेथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व खेळासाठी संधी उपलब्ध करुन देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.


रिधिमा गुंदेचा यांनी युवक-युवतींमध्ये सकारात्मक बदल घडवून त्यांना सामाजिक चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. युवा वर्ग तणावपूर्ण वातावरणात वावरत असताना त्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. सुमित भट्टड यांनी लायन्स क्लबने समाजसेवेचा ब्रॅण्ड निर्माण केला आहे. आपल्या क्षेत्रात यशस्वी झालेले व्यक्ती सामाजिक देणे या भावनेने या सामाजिक कार्यात योगदान देत असल्याचे स्पष्ट केले. आशिष बोरावके यांनी नवीन कार्यकारणीस पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी शहरातील विविध लायन्स क्लबचे पधाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.


लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. अनघा पारगावकर, सचिवपदी डॉ. सिमरन वधवा, खजिनदारपदी अंजली कुलकर्णी यांची तर लिओ क्लबच्या अध्यक्षपदी रिधिमा गुंदेचा, सचिवपदी रुचिता कुमार व खजिनदारपदी हर्षवर्धन बोरुडे यांची नियुक्ती जाहीर करुन त्यांना पदाची सुत्रे सोपविण्यात आली. यावेळी केशवराव गाडीळकर या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत नंदिनी तलरेजा, हरमनकौर वधवा यांनी केले. याप्रसंगी अभय मेस्त्री, डॉ मानसी असनानी, डॉ. प्रिया मुनोत, अनिकेश सुकाले, अर्पिता शिंगवी, पुरुषोत्तम झंवर, अजित शिंगवी, गुरनूरसिंग वधवा, जपज्योत बग्गा, हर्ष किथानी, तमन्ना तलवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मानकेश्‍वर व आरोही कांगे यांनी केले. आभार हरजितसिंह वधवा यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *