शहीद जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ लावली झाडे
जय हिंद फाउंडेशनचा उपक्रम
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- कारगिलच्या रौप्य महोत्सवी विजय दिनानिमित्त शुक्रवारी (दि.26 जुलै) जय हिंद फाउंडेशनच्या वतीने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. कारगिल मधील शहीद जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ झाडे लावण्यात आली.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्कॉडन लीडर विद्यासागर कोरडे, निवृत्त कर्नल डॉ. सोमेश्वर गायकवाड, डॉ. अर्चना नागरे, सैनिक कल्याण अधिकारी चित्रसेन गडांकुश यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जय हिंद फाउंडेशनचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, भगवान डोळे, बाबासाहेब घुले, त्रिदल संघटनेचे अध्यक्ष गोवर्धन गर्जे, जय हिंदचे निळकंठ उल्हारे, कौडेश्वर सैनिकचे अशोक मुठे, रमेश गायकवाड, वैभव ऊरमुडे, अंकुश पालमद, अशोक काळापहाड, सुनिल गुंजाळ, रामदास घोडके, विनायक कार्ले, सुभाष गोंडाळ आदी उपस्थित होते.
पाकिस्तान विरोधात झालेल्या कारगिल युध्दाला 25 वर्ष पूर्ण होत असून, यामध्ये भारताने विजय मिळवला होता. या दिवशी शहिदांना आदरांजली व्यक्त करून वृक्षारोपण करण्यात आले. तर वीर माता, वीर पिता, वीर पत्नी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी 25 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. आंबा, चिंच, आवळा, जांभूळ आदी देशी फळ झाडांची लागवड करण्यात आली.
शहीदांची आठवण वृक्षाच्या माध्यमातून जीवंत रहावी व पर्यावरणाचे संतुलन रहावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे शिवाजी पालवे यांनी स्पष्ट केले. स्कॉडन लीडर विद्यासागर कोरडे यांनी जय हिंदच्या माध्यमातून जिल्ह्यात सुरु असलेल्या वृक्षरोपण व संवर्धन मोहिमेचे कौतुक केले. तर माजी सैनिक या चळवळीत देत असलेल्या योगदान अभिमानास्पद असल्याची भावना व्यक्त केली.