राष्ट्रवादीच्या विकासात्मक विचारधारेला युवा वर्ग जोडला जात आहे -आ. संग्राम जगताप
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) दाखल झालेले आनंद लहामगे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. लहामगे यांची नियुक्ती झाल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, विकी तिवारी, उद्योजक सचिन डेरे पाटील, पप्पू पाटील आदी उपस्थित होते.
शिवसेनेचे (ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख लहामगे यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री ना. अजीत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांची राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांच्याकडे जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, राष्ट्रवादीच्या विकासात्मक विचारधारेला युवा वर्ग जोडला जात आहे. सत्तेतून सर्वसामान्यांची कामे करुन शहराचा विकासात्मक बदल केला जात आहे. राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊन कार्य सुरु आहे. लहामगे यांचे जिल्ह्यात सुरु असलेले राजकीय व सामाजिक कार्य दिशादर्शक आहे. पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांची प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत राहण्यासाठी लहामगे यांना शुभेच्छा दिल्या.
आनंद लहामगे यांनी सत्काराला उत्तर देताना राष्ट्रवादी पक्षात कार्यकर्त्यांना न्याय दिले जाते. तर विविध क्षेत्रातील व्यक्ती पक्षाशी जोडले गेलेले आहे. काम करताना पदाधिकाऱ्यांना ताकत देऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची भूमिका राष्ट्रवादीच्या माध्यमातून घेतली जाते. पदाच्या माध्यमातून पक्ष वाढीसाठी व शहराच्या विकासात्मक दृष्टीकोनाने आमदार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.