गुरुपौर्णिमेनिमित्त ज्येष्ठ केमिस्ट सभासदांचा सन्मान
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा, नगर शहर व तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने स्व.डॉ. आर.जी. सोमाणी यांच्या स्मृती प्रित्यर्थ गुरुपौर्णिमेनिमित्त केमिस्ट बांधवांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव करुन ज्येष्ठ केमिस्ट सभासदांचा सन्मान करण्यात आला. तसेच सायकलवर आषाढी एकादशीची पंढरपूरला वारी करणाऱ्या डॉक्टर व केमिस्ट बांधवांचा सत्कार करण्यात आला.
नगर-पुणे रोड येथील हॉटेल राजयोग मध्ये झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्याते गणेश शिंदे, अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे कार्यकारिणी सदस्य अजित पारख , स्नेहलता सोमाणी उपस्थित होते. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते इयत्ता दहावी, बारावी, स्पर्धा परीक्षा व इतर क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गुरुपौर्णिमेनिमित्त ज्येष्ठ केमिस्ट सभासदांचा सन्मान सोहळा देखील पार पडला.
या कार्यक्रमासाठी जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर, सचिव आबासाहेब बेद्रे, खजिनदार प्रशांत उबाळे, उपाध्यक्ष सूर्यकांत भुजाडी, अमित धाडगे, अवधूत बोरुडे, माऊली दरंदले, शहर केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष भरत सुपेकर, सचिव मनिष सोमाणी, खजिनदार मनोज खेडकर, सहसचिव मनीषा आठरे, महेश आठरे, कमलेश गुंदेचा, नितीन सातपुते, राजेंद्र बेद्रे, संदीप कोकाटे, आदेश जाधव, महेंद्र अनमल, ज्ञानेश्वर पठारे, सचिन ढगे, सागर फुलसौंदर, अनिल क्षीरसागर, ज्येष्ठ केमिस्ट विजयकुमारजी रंगा, डॉ. विनय शहा, अनिल झंवर, विनोद गांधी, अशोक बलदोटा, दीपक दासवानी, संजय गुंदेचा, अनिल गांधी, उदय पटेल आदींसह विद्यार्थी, पालक व केमिस्ट असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर यांनी केमिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करुन त्यांना प्रोत्साहन दिले जाते. केमिस्ट बांधव फक्त व्यवसाय करत नसून, सामाजिक बांधिलकी म्हणून योगदान देखील देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
व्याख्याते गणेश शिंदे यांनी ध्येय प्राप्तीची वाटचाल यशस्वी करण्यासाठी कठोर परिश्रम, जिद्द अंगीकारुन योग्य दिशेने जाण्याचे आवाहन केले. अजित पारख यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित धाडगे व संदीप कोकाटे यांनी केले व आभार सचिव मनिष सोमाणी यांनी मानले.