पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रोप देऊन केला सत्कार
मनुष्याला नवजीवन देण्याचे कार्य डॉक्टर करतात -डॉ. अनघा पारगावकर
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व लिओ क्लबच्या वतीने डॉक्टर व सीए यांचा सन्मान करुन डॉक्टर आणि सीए दिवस संयुक्तपणे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. अमित बडवे, डॉ. संजय असनानी, डॉ. सिमरनकौर वधवा, डॉ. प्रिया मुनोत, डॉ. मानसी असनानी, सीए किरण भंडारी यांचा रोप देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी लायन्सच्या अध्यक्षा डॉ. अनघा पारगावकर, सचिव डॉ. सिमरनकौर वधवा, खजिनदार अंजली कुलकर्णी, लिओ क्लबचे अध्यक्ष रिधिमा गुंदेचा, हर्ष बोरुडे, दिलीप कुलकर्णी, आनंद बोरा, प्रशांत मुनोत, जस्मित वधवा, ऋषिकेश सुकाले, प्रशांत गाडेकर, संतोष माणकेश्वर, किशोर वाईकर, हरजीतसिंग वधवा, प्रणिता भंडारी, प्रिया बोरा, अर्चना माणकेश्वर, प्रिया गाडेकर, सौ. सुकाले आदींसह लायन्सचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. अनघा पारगावकर म्हणाल्या की, समाजात सर्वात मोठी सेवा म्हणजे रुग्णसेवा होय. वेदना दूर करण्यासह मनुष्याला नवजीवन देण्याचे कार्य डॉक्टर करतात. समजात कार्यरत असलेले डॉक्टर व सीए अत्यंत महत्त्वाचे घटक आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. सिमरनकौर वधवा म्हणाल्या की, कोरोना काळात डॉक्टरांनी जीवाची बाजी लावून अनेकांना जीवदान दिले. डॉक्टर हा रुग्णांची सेवा करुन त्यांना नवजीवन देणारा देवदूत आहे. तर समाजातील आर्थिक गणित उत्तम ठेवण्याचे कार्य सीए करीत असतात. त्यामुळे देशाची आर्थिक प्रगती देखील साधली जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.