• Thu. Oct 16th, 2025

20 व 21 जुलैला मोफत उद्योजकता कार्यशाळेचे आयोजन

ByMirror

Jul 4, 2024

अनुसूचित जाती व जमाती मधील युवक, महिला व नव उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जाती व जमाती (एससी/एसटी) मधील युवक, शिक्षक व बेरोजगार युवक-युवती आणि महिलांसाठी नगर शहरातील एमआयडीसी येथे 20 जुलै व कोपरगाव येथे 21 जुलै रोजी एक दिवसीय मोफत उद्योजकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ (एम.एस.एस.आय.डी.सी.) व दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री (डी.आय.सी.सी.आय) च्या वतीने तर शार्प बिझनेस कन्सल्टन्सी व एम.एस.एम.ई. ट्रेनिंग इन्सिट्यूटच्या सहकार्याने ही कार्यशाळा होणार असून, यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


या कार्यशाळेत अनुभवी तज्ञ प्रशिक्षक शासकीय कर्ज व योजनांची माहिती, उद्योजकता विकास, आर्थिक नियोजन, विक्री व्यवस्थापन व संधी इत्यादी विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या प्रशिक्षणात उद्योग उभारणीतील टप्पे, शासकीय-निमशासकीय कार्यालयातील उद्योग उभारणी करीता असलेले शासकीय योजना, सोयी-सुविधा, सवलती, प्रणाली बाबत माहिती व मार्गदर्शन, उद्योग व्यवस्थापन, विपणन व्यवस्थापन, आयात निर्यात तसेच उद्योग उभारणीतील येणाऱ्या अडचणी व निराकरण यावर माहिती दिली जाणार आहे.


या कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थींना सहभागी झाल्याचे शासकीय प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सदर प्रशिक्षणात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी रविराज भालेराव 9960599985, मंगेश उदबत्ते 9373473929(अहमदनगर) व कल्याणी वायकर 8999769985(कोपरगाव) यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *