• Wed. Oct 15th, 2025

जॉइंट सेक्रेटरीपदी निवड झाल्याबद्दल लहामगे यांचा आमदार जगताप यांनी केला सत्कार

ByMirror

Jul 4, 2024

लहामगे यांचे कर सल्लागार म्हणून सुरु असलेले कार्य उत्कृष्ट -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील कर सल्लागार आनंद लहामगे यांची उत्तर महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या जॉइंट सेक्रेटरीपदी निवड झाल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी सुरेश बनसोडे, मयुर बांगरे, पप्पु पाटील, विकी तिवारी, विशाल म्हस्के, ऋतिक लद्दे आदी उपस्थित होते.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले आनंद लहामगे यांचे कर सल्लागार म्हणून शहरात सुरु असलेले कार्य उत्कृष्ट आहे. राज्य पातळीवरच्या टॅक्स प्रॅक्टिशनर्स संघटनेच्या जॉइंट सेक्रेटरीपदाचा मान त्यांना मिळाला असून, हे शहराच्या दृष्टीने भुषणावह असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


सत्काराला उत्तर देताना आनंद लहामगे म्हणाले की, कामामुळे राजकारण, समाजकारणातील व्यक्तींना जोडलो गेलो आहे. राजकीय व सामाजिक कार्यात आमदार जगताप यांचे नेहमीच पाठबळ व मार्गदर्शन मिळत असते. विविध पदावर काम करताना त्यांनी सत्कार रुपाने दिलेला प्रोत्साहन काम करण्यास आनखी ऊर्जा देणारा असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तर प्रेसिडेंटपदी निवड झालेले नितीन डोंगरे यांचे देखील आमदार जगताप यांनी अभिनंदन करुन, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल चव्हाण यांच्याशी फोनवर संपर्क करुन राज्यस्तरीय संघटनेमध्ये जिल्ह्याला दोन महत्त्वाच्या पदांचा मान देऊन दाखवलेल्या विश्‍वासाबद्दल आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *