• Thu. Apr 24th, 2025

महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी मारुती पवार तिसऱ्यांदा बिनविरोध

ByMirror

Jun 29, 2024

सर्व स्तरातूनअभिनंदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी मारुती कुंडलिकराव पवार यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. नुकतेच संस्थेच्या संचालक मंडळाच्या सर्वच्या सर्व 17 जागा बिनविरोध झाल्या असून, त्यामध्ये पवार यांचा समावेश आहे.


मारुती पवार सन 2011 पासून संचालक मंडळावर आहेत. 2016 व नंतर सध्या 2024 मध्ये पुन्हा त्यांना संचालकपदाची जबाबदारी मिळाली आहे. त्यांनी तिनदा व्हाईस चेअरमन म्हणून उत्तमप्रकारे काम देखील पाहिले आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल आमदार अरुणकाका जगताप, आमदार संग्राम जगताप, संस्थेचे संस्थापक चेअरमन नंदकुमार (मन्नुशेठ) झंवर, विद्यमान चेअरमन डॉ. अशोक चेंगडे, व्हाईस चेअरमन शांतीलाल मुनोत, ज्येष्ठ संचालक सुंदरलाल भंडारी आदींसह सर्व संचालकांनी शुभेच्छा दिल्या. सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *