• Wed. Oct 15th, 2025

आनंदऋषीजी हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी भंडारी यांचा सत्कार

ByMirror

Jun 26, 2024

प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने हॉस्पिटलच्या कार्याचे कौतुक

अहमदनगर (प्रतिनिधी)- गोरगरीब दिव्यांग रुग्णांसाठी आनंदऋषीजी हॉस्पिटल आधार ठरला आहे. दिव्यांगांना अल्पदरात माणुसकीच्या भावनेने उपचार देऊन कुटुंबाप्रमाणे वागणुक मिळत असल्याची भावना प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. लक्ष्मण पोकळे यांनी केले.


प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने दिव्यांग रुग्णांसाठी नेहमीच सहकार्य करणारे आनंदऋषीजी हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी डॉ. आशिष भंडारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ॲड. पोकळे बोलत होते. याप्रसंगी आरएमओ इनचार्ज डॉ. समीर सय्यद, जिल्हा समन्वयक डॉ. मयुर मुथा, प्रहार संघटनेचे राजेंद्र पोकळे, संदेश रपारिया, पोपट शेळके आदी उपस्थित होते.


आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या आरोग्य मंदिरात सर्वसामान्यांप्रमाणे दिव्यांगांना देखील सन्मानाची वागणूक देऊन उपचार केले जात असल्याची भावना राजेंद्र पोकळे यांनी व्यक्त केली. दिव्यांग बांधवांनी केलेल्या सन्मानाने भारावल्याची भावना डॉ. आशिष भंडारी यांनी व्यक्त करुन हा सत्कार आनखी चांगले कार्य करण्यास प्रेरणा देत राहणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *