कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकार्यांमुळे समाजात शांतता, सुव्यवस्था टिकून -विजय भालसिंग
अहमदनगर(प्रतिनिधी)- महाराष्ट्र दिनानिमित्त कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांचा सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी सत्कार केला. शहरात सामाजिक शांतता, सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
समाजकंटक शहरात जातीय तेढ पसरवून शहराची शांतता भंग करण्याचे काम करत आहे. पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी अशा समाजकंटकांचा बंदोबस्त करण्यासाठी कठोर पावले उचलली असून, अशा विघातक प्रवृत्तींवर लगाम लावला आहे. तसेच कोरोना काळातही त्यांनी सामाजिक संघटनांना बरोबर घेऊन सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम केले. अशा कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकार्यांमुळे समाजात शांतता, सुव्यवस्था टिकून आहे. त्यांच्या कार्याला सलाम म्हणून त्यांचा महाराष्ट्र दिनानिमित्त सत्कार करण्यात आला असल्याचे भालसिंग यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते भालसिंग दरवर्षी 1 मे महाराष्ट्र दिनी पोलीस दलात उत्कृष्ट कार्य करणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान करत असतात.