• Tue. Oct 28th, 2025

रांगोळी स्पर्धेत महिला व युवतींनी पटकाविली बक्षीसे

ByMirror

Jun 3, 2024

समाजात परंपरा व संस्कृतीचा वारसा महिलांमुळे टिकला -प्रकाश भागानगरे

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजात परंपरा व संस्कृतीचा वारसा महिलांमुळे टिकला आहे. कुटुंब सांभाळून समाजाला संस्कारी करण्याचे काम महिला त्या करत आहे. महिला सक्षम झाल्यास खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती साधली जाणार असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी केले.


प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी भागानगरे बोलत होते. यावेळी नम्रता दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, उपाध्यक्षा उषा सोनी, प्रयास ग्रुपच्या उपाध्यक्षा वंदना गारुडकर, मंगल चोपडा, विद्या बडवे, अध्यक्षा अलकाताई मुंदडा, मेघना मुनोत, रजनी भंडारी, ज्योत्स्ना कुलकर्णी, उषा सोनटक्के, ज्योती गांधी, कुसुमसिंग, छाया राजपूत, शुभदा देवकर, साधना भळगट, हिरा शहापुरे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


पुढे भागानगरे म्हणाले की, प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या माध्यमातून महिलांना सातत्याने प्रोत्साहन देण्याचे काम केले जात आहे. महिला व युवतींच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे त्यांनी सांगितले.


प्रास्ताविकात अलकाताई मुंदडा यांनी महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. पाहुण्यांचे स्वागत विद्या बडवे यांनी केले. रांगोळी स्पर्धेतील विजेत्या प्रथम- समृद्धी राजेंद्र राऊत, द्वितीय- सोनल पंकज लड्डा, तृतीय- हर्षदा दादासाहेब पाठक, उत्तेजनार्थ- अनुष्का दिनेश कापरे, राजुल बोरा यांना प्रमाणपत्र रोख बक्षीसे देण्यात आली. यावेळी महिलांसाठी विविध मनोरंजन, कौशल्यात्मक व बौध्दिक स्पर्धा रंगल्या होत्या. बौध्दिक स्पर्धा मेघना मुनोत यांनी घेतल्या. यामध्ये रेश्‍मा पोकळे, नाजिया खान, संगीता देशमुख, तारा लड्डा, निर्मला भळगट यांना बक्षीसे मिळवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा झंवर यांनी केले. आभार प्रदर्शन जीवनलता पोखरणा यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *