• Sat. Mar 15th, 2025

कामगार दिनानिमित्त उद्यान विभागातील कामगारांचा सन्मान व मतदार जागृती

ByMirror

May 2, 2024

हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम

कॉस्ट ॲण्ड मॅनेजमेंट अकाउंट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्नेहा खोत हिचा सत्कार

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- कामगार दिनानिमित्त हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने बुधवारी (दि.1 मे) भिंगार कॅन्टोन्मेंट मधील उद्यान विभागातील कामगारांचा सन्मान करण्यात आला. भगवान गौतमबुध्द जॉगींग पार्कमध्ये झालेल्या कार्यक्रमात नागरिकांना कोणत्याही अमिषाला बळी न पडता, निर्भय व धर्मनिरपेक्षपणे मतदान करुन मतदानाचा हक्क बजावण्याचा व लोकशाही सक्षम करण्याची शपथ देण्यात आली.


सीए रवींद्र कटारिया, स्वामी विवेकानंद प्रबोधिनी ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद मुळे व हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांच्या हस्ते वर्षभर उद्यानातील झाडांची काळजी घेऊन त्यांचे संवर्धन करणारे कॅन्टोन्मेंट उद्यान विभागातील कामगार बबन वैरागळ, विशाल भामरे, मुरलीधर बरबडे, राहुल भिंगारदिवे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कॉस्ट ॲण्ड मॅनेजमेंट अकाउंट (सीएमए) ही प्रोफेशनल परीक्षा उत्तीर्ण होऊन एका नामांकित कंपनीत नियुक्ती झाल्याबद्दल स्नेहा विनोद खोत हिचा विशेष सत्कार करण्यात आला. ईवान सपकाळ व नंदलाल परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्यानात वृक्षरोपण करण्यात आले.


यावेळी विनोद खोत, सर्वेश सपकाळ, रमेश वराडे, सुमेश केदारे, दिलीप ठोकळ, दीपक बडदे, जहीर सय्यद, दीपक धाडगे, दिलीप गुगळे, सचिन चोपडा, विठ्ठल राहिंज, अथर्व सपकाळ, बापू तांबे, अभिजीत सपकाळ, शशांक अबनावे, अशोक पराते, किशोर भिंगारकर, सुभाष पेंढूरकर, दिनेश शहापूरकर, नामदेव जावळे, प्रभाकर सपकाळ, प्रांजली सपकाळ, ज्योती झावरे, संगीता सपकाळ, सुनिता खोत, श्रावणी देवगुडे, भार्गवी दातीर, तनिष्का सावळे, लताबाई सपकाळ, सतीश सपकाळ, विलास तोतरे, नितीन पाटोळे, मुन्ना वाघस्कर, राजू कांबळे, अविनाश पोतदार, सुंदरराव पाटील, सरदारसिंह परदेशी, अविनाश जाधव, रवींद्र जाजू, सिताराम परदेशी, अभिजीत सपकाळ, शेषराव पालवे, रमेश कोठारी, सुहास देवराईकर, सुभाष रासने, मंगेश मोकळ, किरण फुलारी, केशव दवणे, दत्तात्रेय लाहुंडे, हरी शेलार, प्रकाश भिंगारदिवे, अनिल ताठे, योगेश चौधरी, गोकुळ भांगे, शेखर चौधरी, नवनाथ डपकर, शशांक अंबावडे, सचिन कस्तुरे, राम झिंजे आदी उपस्थित होते.


सीए रवींद्र कटारिया म्हणाले की, कामगार वर्ग समाजातील वैभव निर्माण करण्याचे व टिकविण्याचे काम करतात. विकासात कामगार वर्गाचा सर्वात मोठा वाटा आहे. पर्यावरण संवर्धनासाठी वर्षभर उद्यानातील झाडांचे पालनपोषण करणाऱ्या कामगारांचा झालेला सन्मान अभिनंदनीय असल्याचे त्यांनी सांगितले.


संजय सपकाळ म्हणाले की, मतदानाने आपले व आपल्या भावी पिढीचे भवितव्य ठरणार आहे. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. आपल्या मतातून लोकशाहीला बळ मिळणार असल्याचे सांगून त्यांनी उपस्थितांना मतदानाचे कर्तव्य बजावण्याची शपथ दिली. अरविंद ब्राह्मणे यांनी आपल्या मनोगतामध्ये देशातील कामगार चळवळीचे महत्त्व विशद केले. प्रमोद मुळे व शिवप्रसाद काळे यांनी ऑनलाईन पध्दतीने मतदार यादीत नाव शोधून कोणत्या बुथवर आपले मतदान असल्याची माहिती मिळविण्याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. सुमेश केदारे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *