छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन
संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान युवकांना प्रेरणादायी -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासनिमित्त निमगाव वाघा येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने रक्तदान शिबिर राबविण्यात आले. या रक्तदान शिबिरात युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करुन संभाजी महाराजांना आदरांजली वाहिली.
छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, भाऊसाहेब (पिंटू) जाधव, अनिल डोंगरे, अजय ठाणगे, भरत बोडखे, पिनू जाधव, नवनाथ फलके, दत्ता ठाणगे, भानुदास ठोकळ, अमोल गायकवाड, किशोर काळे, भाऊसाहेब जाधव, मयुर काळे, कैलास जाधव, विष्णू शिंदे, संदीप उधार, जनकल्याण रक्त केंद्राचे डॉ. काळे, शरद बळे, मनिषा जोशी, सुलभा पवळ, अनिता तरटे, मोहन शर्मा, यादव आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, संभाजी महाराजांचे कार्य व स्वराज्यासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाचा इतिहास प्रेरणादायी आहे. युवकांना प्रेरणा मिळण्यासाठी महापुरुषांचा इतिहास ज्ञात असला पाहिजे. इतिहास घडविणारी माणसे इतिहासामधून प्रेरणा घेत असतात. युवकांनी रक्तदान शिबिरातून संभाजी महाराजांना केलेले अभिवादन कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. गावात संपूर्ण महिनाभर बलिदान मास निमित्त महाराजांना श्लोक वाचनातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
