कार्यकर्त्यांना फक्त राजकारणापुरते मर्यादित न ठेवता त्यांना आयुष्यात पुढे जाण्याचे जगताप यांनी बळ दिले – प्रा. माणिक विधाते
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात मा. आमदार अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आरती करुन श्री विशाल गणेश चरणी त्यांच्या निरोगी व दिर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी मंदिराचे विश्वस्त प्रा. माणिक विधाते, ज्ञानेश्वर रासकर, बजरंग भूतारे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अमित खामकर, मळू गाडळकर, संतोष ढाकणे, वैभव ढाकणे, कमलेश भंडारी, सागर गुंजाळ, गौरव कचरे, लहू कराळे, मुथा, सागर ठोंबरे, नाना आंबेकर, श्रीकांत आंबेकर, अनिकेत फुले, पै. विशाल गाढवे, म्हस्के, निलेश हिंगे, भालसिंग आदी उपस्थित होते.

प्रा. माणिक विधाते म्हणाले की, अरुणकाका जगताप सर्व मित्र परिवार व कार्यकर्त्यांना यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवित आहे. प्रत्येकाला कुटुंबाप्रमाणे प्रेम देवून आपुलकीने आधार देण्याचे काम ते करतात. अनेक कार्यकर्त्यांना घडवून त्यांना फक्त राजकारणापुरते मर्यादित न ठेवता त्यांना आयुष्यात पुढे जाण्याचे बळ त्यांनी दिले आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक कार्यकर्ते जीवनात यशस्वी झाले असून, विविध क्षेत्रात आपले कार्यकर्तृत्व गाजवत आहे. त्यांच्या निरोगी व दिर्घायुष्यासाठी सर्वांचे प्रेम व आशिर्वाद त्यांच्या पाठिशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
