रामवाडीच्या महिलांनी घेतली उपायुक्तांची भेट; पाण्याची पाईपलाइन दुरुस्त करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडी भागात पाणीपुरवठा करणारी पाईपलाइन तुटल्याने पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना स्थानिक महिलांनी मनपा उपायुक्त डॉ. सचिन बांगर यांची भेट घेवून सदर पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करुन देण्याची मागणी करण्यात आली.
विकास उडानशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर पाण्याचा प्रश्न मांडण्यात आला. यावेळी कल्पना मंडलिक, रवीना उल्हारे, दिपाली उल्हारे, नीता उडाणशिवे, सोनाली अडागळे, दुल्हनबाई गायकवाड, शिलाबाई वैरागर, मीना गायकवाड, मंदा वाघमारे, कमल उल्हारे, अलका काळोखे, अनुसया सोनवणे, मनीषा घोरपडे आदींसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

16 मार्च रोजी कराचीवाला नगर मध्ये रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. सदर रस्त्याच्या कडेला पितळे वस्तीगृह ते कराचीवाला नगर ते रामवाडी अशी पिण्याचे पाण्याची पाईपलाइन पूर्वीपासून आहे. या कामामध्ये रामवाडी भागात पाणीपुरवठा करणारी पिण्याचे पाईपलाइन तुटली. यामुळे रामवाडी भागात पिण्याचे पाणी येण्यास बंद झाले आहे. तर तुटलेल्या पाईपलाइन मधून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले.
काही महिन्यांपासून महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट सुरु आहे. सद्यस्थितीमध्ये आचारसंहिता सुरू झाली आहे. इतक्या तातडीने कामासाठी रस्ता खोदून पिण्याच्या पाण्याची पाईपलाइन तुटल्याने येथील नागरिकांमध्ये मनापा प्रशासनाविषयी गैरसमज निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. याप्रकरणी तातडीने पिण्याची पाण्याची पाईपलाइन तातडीने दुरुस्त करुन नागरिकांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा करण्याची मागणी रामवाडी येथील नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.