• Thu. Jul 24th, 2025

विविध क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या सदस्यांचा हरदिनच्या वतीने गौरव

ByMirror

Mar 15, 2024

शासनाचा पुरस्कार प्राप्त नकवाल तर उपअभियंता पदी बढती मिळालेले भोसले यांचा सत्कार

निरोगी जीवनातच जीवनाचा खरा आनंद -संजय सपकाळ

अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने विविध क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या ग्रुपच्या सदस्यांचा गौरव करण्यात आला. तर भिंगारच्या भगवान गौतमबुध्द जॉगींग पार्कमध्ये वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.


महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल राधेलाल नकवाल व जिल्हा परिषदेत उपअभियंता पदावर बढती मिळाल्याबद्दल गणेश भोसले यांचा ग्रुपच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांनी सत्कार केला. विकास भिंगारदिवे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी विकास भिंगारदिवे, राधेलाल नकवाल, जहीर सय्यद, गणेश भोसले, सुमेश केदारे, रमेश वराडे, दिलीप गुगळे, सर्वेश सपकाळ, मेजर दिलीप ठोकळ, अभिजीत सपकाळ, सचिन चोपडा, किशोर भगवाने, सरदारसिंग परदेशी, अशोक पराते, संजय भिंगारदिवे, अशोक दळवी, मनोहर दरवडे, दीपक धाडगे, अशोक लोंढे, विलास तोतरे, नामदेव जावळे, मुन्ना वाघस्कर, राजू कांबळे, सूर्यकांत कटोरे, किरण फुलारी, अशोक भगवाने, अनंत सदलापूर, सिताराम परदेशी, रामनाथ गर्जे, विनोद खोत, अविनाश जाधव, विठ्ठल राहिंज, प्रकाश देवळालीकर, जालिंदर बेल्हेकर, नवनाथ वेताळ, संतोष हजारे, जालिंदर अळकुटे, संतोष लुणिया, रमेश कोठारी, रमेश धाडगे, योगेश चौधरी, दत्तात्रेय लाहुंडे, ज्ञानेश्‍वर पवार, प्रशांत भिंगारदिवे, मेजर सुरेश भगत, विकास चेमटे, अजय खंडागळे, संजय नायडू आदींसह ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संजय सपकाळ म्हणाले की, ज्याचे स्वास्थ्य चांगले, तो सर्वसंपन्न व्यक्ती होय. निरोगी जीवनातच जीवनाचा खरा आनंद असून, हरदिन मॉर्निंग ग्रुप निरोगी आरोग्यासाठी चळवळ चालवून पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देत आहे. ग्रुप हा परिवार बनला असून, यश प्राप्त करणाऱ्या परिवारातील सदस्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा गौरव करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
राधेलाल नकवाल म्हणाले की, हरदिन मॉर्निंग ग्रुपने भिंगारमध्ये निरोगी आरोग्याचा पाया रचला. मागील 24 वर्षापासून हे कार्य सतत अविरतपणे सुरू असून, पर्यावरणासाठी वृक्षारोपण व संवर्धनाचे कार्य देखील सुरु आहे. ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक कार्याला प्रोत्साहन मिळत असून, ग्रुपच्या माध्यमातून झालेल्या सन्मानाने सामाजिक कार्य करण्यास बळ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गणेश भोसले यांनी हरदिन मॉर्निंग ग्रुप हे एक कुटुंब असून, अशा ग्रुपच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील व्यक्ती एकमेकांना जोडले जात आहे. प्रत्येक सदस्यांचा वाढदिवसही वृक्षरोपण व सामाजिक उपक्रमाने साजरा होत असून एक सामाजिक चळवळ बहरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *