अहमदनगर (प्रतिनिधी)- जायंटस् ग्रुप ऑफ अहमदनगरच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय व पशुधन विकास अधिकारी डॉ. वर्षा साबळे, जिल्हा बँकेच्या अधिकारी विद्या तन्वर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयातील गीता फुंदे व पेट्रोल पंपावरील महिला कामगार दीपिका शेलार, मैथलीं ब्युटी पार्लरच्या संचालिका तथा जायंट्स ग्रुपच्या अध्यक्षा पूजा पातुरकर या महिलांना गौरविण्यात आले.

प्रास्तविकात जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनचे सदस्य संजय गुगळे यांनी ग्रुपच्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.सत्कारास उत्तर देताना डॉ. वर्षा साबळे म्हणाल्या, जायंटस् ग्रुपच्या सामाजिक कार्यात महिलांचा मोठा वाटा आहे. ग्रुपच्या वतीने महिलांनादेखील संधी देण्यात येत असल्याने महिला आपले कार्य सिध्द करत आहेत.
नुतन गुगळे यांनी कौटुंबिक जबाबदारी पार पाडून महिला अनेक अडचणींवर मात करुन कर्तृत्व गाजवत आहेत. महिलांना समाजात दुय्यम स्थान न देता प्रोत्साहन देण्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ. मुकुंद राजळे, अभय मुथा, शौर्य मुथा, दर्शन गुगळे, पशुधन विकास अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर काळे आदी उपस्थित होते.
