• Mon. Jul 21st, 2025

प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या महिलांनी केला स्त्री शक्तीचा जागर

ByMirror

Mar 3, 2024

गुलाबी रंगाच्या साड्या परिधान करुन महिला एकवटल्या

अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या महिलांनी एकत्र येत स्त्री शक्तीचा जागर करुन महिला दिन साजरा केला. सर्व महिला गुलाबी रंगाच्या साड्या परिधान करुन एकवटल्या होत्या. यावेळी महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक व बौध्दिक खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या.


या कार्यक्रमासाठी वर्षा सिनारे, नीलिमा पवार, नंदिनी गांधी, प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा, मेघना मुनोत, उषा सोनी, जयश्री पुरोहित, राखी जाधव, साधना भळगट, दीपा मालू, उषा सोनटक्के, रजनी भंडारी, शशिकला झरेकर, सोनल लड्डा, दीपा मालू, दीपा राछ आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


वर्षा सिनारे म्हणाल्या की, महिलांनी महिलांना आधार दिल्यास अनेक प्रश्‍न सुटणार आहे. प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या माध्यमातून वर्षभर महिलांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरु आहे. महिलांसाठी विविध उपक्रम राबवून, महिलांचा सर्वांगीन विकास व आरोग्याबरोबर जीवनात आनंद निर्माण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रास्ताविकात अलका मुंदडा यांनी मागील अनेक वर्षापासून महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने यास ग्रुप कार्य करीत आहे. एका दिवसापुरता महिला दिन साजरा न करता, वर्षभर महिलांसाठी या ग्रुपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असल्याची त्यांनी माहिती दिली.


यावेळी महिलांच्या विविध मनोरंजनात्मक व बौध्दिक खेळाच्या स्पर्धा रंगल्या होत्या. विजेत्या महिलांना वर्षा सिनारे, नीलिमा पवार, नंदिनी गांधी यांच्या वतीने बक्षीसे देण्यात आली. महिला दिनानिमित्त सोनल लड्डा यांनी महिला सक्षमीकरणाचे दर्शन घडविणारी रांगोळी रेखाटली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्‍विनी जैन यांनी केले. आभार दीप्ती मुंदडा यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *