बिकट परिस्थितीवर मात करुन स्पर्धा परीक्षेतून मिळवले यश
अहमदनगर (प्रतिनिधी)- बिकट परिस्थितीवर मात करुन सहाय्यक संचालक औद्योगिक सुरक्षा आरोग्य अधिकारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल श्रीनिवास गणेश सब्बन यांचा नगरसेवक मनोज दुलम व अखंड श्रमिकनगर समुदायाच्या वतीने सत्कार करण्यात आला. वडिलांचा चहाचा व्यवसाय तर आई विडी कामगार असून, सब्बन यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पद्मशाली समाजातील अत्यंत गरीब परिस्थितीतून आलेले श्रीनिवास सब्बन यांनी श्रमिकनगरच्या मार्कंडेय विद्यालयात शिक्षण पूर्ण केले. श्रीनिवास याचे वडील चहाचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवतात. तर आई विडी कामगार आहे. कुटुंबातील दोन मुले व दोन मुली यांना त्यांनी उच्चाशिक्षित केले. श्रीनिवास यांनी कामासोबतच इंजिनिअरिंग करून एम.बी.ए. पूर्ण केले. त्यानंतर नगरमधील एमआयडीसीमधील कमिन्स कंपनीत नोकरी करत महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याची नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या सहाय्यक संचालक औद्योगिक सुरक्षा आरोग्य अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.
नगरसेवक मनोज दुलम म्हणाले की, श्रीनिवास सब्बन यांनी मिळवलेले यश समाजाच्या दृष्टीने भूषणावह आहे. बिकट परिस्थितीवर मात करुन त्यांनी ध्येय प्राप्त केले असून, त्यांचे यश सर्व समाजातील युवक-युवतींना प्रेरणादायी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी उद्योजक उदय कराळे, विलास सग्गम, विनोद म्याना, नारायण कोडम, गणेश सब्बन, सागर येमुल, गणेश येमुल, दत्तात्रय आरकल, ज्ञानेश्वर सुंकी, राजू येमुल, कार्तिक क्षीरसागर, दिनेश पुसदकर, सुनील वराडे, विशाल गोसके, अमृत सद्रे, विनीत बुरला, विजय बोज्जा, अरुण ताटी, नरसय्या काटाबत्तीन, अंबादास वंगार, कृष्णा यंगल, सचिन पडगे, चंद्रकांत कोमटी, किरण वल्लाकट्टी, बालाजी कोंडा, भास्कर दिकोंडा, अशोक काटाबत्तीन, दत्तात्रय भिमनाथ, सागर मेहसुनी, नरेश कोटा, राजू बुरा, सोनालीताई दुलम, रेखाताई दुलम, भारती न्यालपेल्ली, सुवर्णाताई दगडे, इंदुमतीताई सब्बन, पद्मिनी सब्बन, शितल चिलवर आदी उपस्थित होते.