उमेद सोशल फाऊंडेशनचा उपक्रम
यशस्वी होण्यासाठी बुध्दीबरोबर युक्ती व शक्ती देखील महत्त्वाची -लक्ष्मण पारोळेकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उमेद सोशल फाऊंडेशनच्या वतीने बोल्हेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. फास्टफुडच्या युगात विद्यार्थ्यांचे आरोग्य बिघडत चालले असताना विद्यार्थ्यांच्या सदृढ आरोग्यासाठी व्यायाम, आहाराबद्दल मार्गदर्शन करुन तज्ञ डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मण पारोळेकर, उमेद सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे, उपाध्यक्ष कुणाल तनपुरे, सल्लागार ॲड.दीपक धिवर, सदस्य विजय लोंढे, रवी सुरेकर, प्रकाश भालेराव, योगेश घोलप, शाळेचे मुख्याध्यापक संजय बोबडे, प्रकाश मेढे, आशा मुळे, संजना बीडे, सुजाता काळे, पुनम दिवटे, संगीता पाठक, अंजली जाधव, संजय साळुंके आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लक्ष्मण पारोळेकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी शिवाजी महाराजांचा आदर्श व विचार समोर ठेवावा. फक्त बुध्दी असून चालणार नाही, तर त्या बरोबर युक्ती व शक्ती देखील महत्त्वाची आहे. स्वराज्य निर्माण करताना त्यांला आलेल्या अडचणी त्यातून काढण्यात आलेला मार्ग हे यशस्वी जीवनाचा खरा कानमंत्र असल्याचे त्यांनी सांगितले.
अनिल साळवे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी समतेवर आधारित लोककल्याणकारी राज्याची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य स्थापन करुन आधुनिक लोकशाहीचा पाया रचला. मानवी मुल्यांचा आदर्श त्यांनी जगासमोर आनला. त्यांचा आदर्श समाजाच्या विकासासाठी दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिरात काकासाहेब म्हस्के होमिओपॅथी मेडिकल कॉलेज संचालित काकासाहेब म्हस्के कामगार हॉस्पिटलचे डॉ.वर्षा डोंगरे, डॉ.देविका मोरे, डॉ.सुचिता गुडेकर, डॉ.अहिल्या गावडे, डॉ.यशवंत ढवळे, डॉ.वेदांत अटकरी, डॉ. देविदास गायकवाड, डॉ. ऋतुजा बोरुडे यांच्या टिमने विद्यार्थ्यांची शारीरिक स्वच्छता, दाताची स्वछता, आहार व व्यायाम या विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश मेढे यांनी केले. आभार आशा मुळे यांनी मानले.