• Mon. Jul 21st, 2025

जिल्हा तालिम संघाच्या वतीने भिंगार अर्बन बँकेचे नुतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार

ByMirror

Feb 15, 2024

भिंगार अर्बन बँकेने भिंगार मधील उद्योग, व्यापाऱ्याला चालना देण्याचे काम केले -वैभव लांडगे

अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार अर्बन बँकेच्या चेअरमनपदी अनिल झोडगे व व्हाईस चेअरमनपदी किसनराव चौधरी यांची निवड झाल्याबद्दल अहमदनगर जिल्हा तालिम संघाच्या वतीने त्यांच्यासह नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे यांनी चेअरमन, व्हाईस चेअरमन यांच्यासह संचालक विष्णू फुलसौंदर, एकनाथ जाधव, नामदेव लंगोटे यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हा तालिम संघाचे खजिनदार पै. नाना डोंगरे, माजी नगरसेवक सुनील भिंगारे, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.


वैभव लांडगे म्हणाले की, भिंगार अर्बन बँकेच्या निवडणुकीत भृंगऋषी पॅनलने निर्विवाद वर्चस्व सिध्द केले. बँकेच्या सभासदांनी संचालक मंडळावर टाकलेला विश्‍वास हा त्यांच्या कामाची खरी पावती आहे. त्यांनी केलेल्या कामाने संस्थेच्या नावलौकिकात भर पडली आहे. बँकेच्या माध्यमातून भिंगार शहरातील उद्योग व्यापाऱ्याला चालना देण्याचे काम केले जात आहे.


सत्काराला उत्तर देताना नुतन चेअरमन अनिल झोडगे म्हणाले की, भिंगार बँकेला मोठी परंपरा लाभलेली आहे. सभासद, संचालक, खातेदार, ठेवीदार यांच्या विश्‍वासाला पात्र राहून बँकेचा कारभाराच्या नावलौकिकात भर टाकण्याचे काम सुरू आहे. बँकेत आधुनिक तंत्रप्रणालीचा स्वीकार करून बँकेची यापुढेही प्रगतीची घोडदौड सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *