भगवान गौतम बुद्ध पुतळा परिसरातील सुशोभीकरणाला नवनिर्वाचित संचालकांची आर्थिक मदत
भिंगार अर्बन बँकेच्या माध्यमातून भिंगार शहरातील उद्योग व्यापाऱ्याला चालना -संजय सपकाळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार अर्बन बँकेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. भिंगार येथील जॉगिंग पार्कमध्ये झालेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी भिंगार अर्बन बँकेच्या नूतन संचालकांनी उद्यानात असलेल्या भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळा परिसरातील सुशोभीकरणास आर्थिक मदत जाहीर केली.
या कार्यक्रमात भिंगार अर्बन बँकेच्या निवडणुकीत निवडून आलेले पॅनल प्रमुख अनिल झोडगे, व्हाईस चेअरमन किसन चौधरी, संचालक नामदेवराव लंगोटे, एकनाथ जाधव, अमोल धाडगे, माधव गोंधळे, महेश झोडगे, कैलास रासकर, रुपेश भंडारी, कैलास दळवी, महिला संचालिका तिलोत्तमा करांडे, अनिता भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला. तर भाऊसाहेब फिरोदिया शाळेतील शिक्षक गौतम भिंगारदिवे यांच्या सेवापुर्तीनिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश वराडे, अशोक रासकर, जहीर सय्यद, दिलीप ठोकळ, सुमेश केदारे, सर्वेश सपकाळ, दीपक बडदे, अभिजीत सपकाळ, सचिन चोपडा, विकास भिंगारदिवे, मच्छिंद्र बेरड, एकनाथ जगताप, दीपक अमृत, दिलीप गुगळे, दीपक धाडगे, मनोहर दरवडे, शिवाजी बनकर, नामदेव जावळे, अशोक पराते, किरण फुलारी, विलास तोतरे, रामनाथ गर्जे, सरदारसिंग परदेशी, प्रफुल्ल मुळे, विठ्ठल राहिंज आदी उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, भिंगार अर्बन बँकेच्या निवडणुकीत भृंगऋषी पॅनलचे सर्व संचालक निवडून आले. बँकेच्या सभासदांनी संचालक मंडळावर टाकलेला विश्वास हा त्यांच्या कामाची खरी पावती आहे. त्यांनी केलेल्या कामाने संस्थेच्या नावलौकिकात भर पडली आहे. बँकेच्या माध्यमातून भिंगार शहरातील उद्योग व्यापाऱ्याला चालना देण्याचे काम करण्यात आले. यामुळे शहराचा देखील विकास साधला गेला असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना अनिल झोडगे म्हणाले की, हरदिन मॉर्निंग ग्रुप एका कुटुंबाप्रमाणे आरोग्य व पर्यावरण चळवळ चालवत आहे. निस्वार्थ भावनेने संघटनेचे सदस्य योगदान देत आहे. बँकेच्या सभासदांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता त्यांच्या विकासासाठी योगदान दिले जाणार आहे व बँकेच्या प्रगती साधली जाणार आहे. सर्वसामान्यांना अर्थसहाय्य पुरवून, थकीत कर्जदेखील वसूल केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू कांबळे, संजय वाकचौरे, विनोद खोत, संतोष लुनिया, सुंदरराव पाटील, मुन्ना वागस्कर, शंकरराव पंगुडवाले, सूर्यकांत कटोरे, राजू शेख, किशोर भगवाने, अशोक लोंढे, अशोक भगवाने, शिवकुमार पांचारिया, योगेश करांडे, सिद्धू तात्या बेरड, रमेश धाडगे, पोपट लिपाने, संजय भिंगारदिवे, जालिंदर अळकुटे, नवनाथ वेताळ, राजेंद्र पांढरे, गोकुळ भांगे, महेश सरोदे, दिनकर धाडगे, भाऊसाहेब दळवी, कुमार धतुरे, अजय आठवले, सुनील थोरात, रावसाहेब हसंए, तुषार घाडगे, प्रवीण परदेशी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक अमृत यांनी केले. आभार मच्छिंद्र बेरड यांनी मानले.