आनंदऋषीजी हॉस्पिटलने नेहमीच सेवाभाव जपला -सुरेशलाल छल्लानी
अहमदनगर (प्रतिनिधी)- इतर मोठ्या हॉस्पिटलमध्ये खर्चिक आरोग्य सुविधा घेणे सर्वसामान्यांना परवडत नाही. आनंदऋषीजी हॉस्पिटल सर्वसामान्यांसाठी आरोग्य मंदिर ठरले आहे. या आरोग्य मंदिरात मनुष्यरुपी ईश्वराची सेवा घडत असून, नेहमीच हॉस्पिटलने सेवाभाव जपला आहे. या मानवतेच्या कार्यात छल्लानी परिवाराचे नेहमीच योगदान राहणार असल्याचे प्रतिपादन सुरेशलाल छल्लानी यांनी केले.
जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल ॲण्ड मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये स्व. हरकचंदजी छल्लानी व स्व. बदामबाई हरकचंदजी छल्लानी यांच्या स्मरणार्थ छल्लानी परिवाराच्या वतीने घेण्यात आलेल्या मोफत दंत रोग तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी सुरेशलाल छल्लानी बोलत होते. यावेळी रमनलाल छल्लानी, प्रकाशलाल छल्लानी,
मंगला छल्लानी, डॉ. प्रियंका छल्लानी, उज्वला छल्लानी, संतोष छल्लानी, पारस छल्लानी, राहुल छल्लानी, सारिका छल्लानी, रंजना छल्लानी, डॉ. आशिष भंडारी, डॉ. प्रकाश कांकरिया, निखलेंद्र लोढा, मानकचंद कटारिया, संतोष बोथरा, वसंत चोपडा, डॉ. अपर्णा पवार, डॉ. प्राची गांधी, डॉ. प्रणव डुंगरवाल, डॉ. तृप्ती डुंगरवाल आदी उपस्थित होते.

प्रारंभी पद्म ऋषीजी महाराजांनी शिबिराला भेट देऊन आशीर्वाद दिले. प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये अद्यावत डेंटल विभाग सुरू झाला आहे. अत्यंत खर्चिक असलेली दंत रोगाची उपचार पद्धती सर्वसामान्यांना कमी खर्चामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने गरजूंना अद्यावत सुपर स्पेशलिटी आरोग्य सेवा दिली जात असून, हॉस्पिटलने सर्वसामान्य वर्गामध्ये मोठा विश्वास निर्माण केल्याने या विभागाला देखील जिल्ह्यातून प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. अपर्णा पवार यांनी हॉस्पिटलच्या दंतरोग विभागात अत्यल्प दरात रुग्णांना दंत व जबड्यासंबंधी सर्व उपचार पध्दतीची माहिती दिली. तर शनिवारी दंत रोग विभागाची ओपीडीची मोफत सेवा नागरिकांना मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या शिबिरात 175 रुग्णांची मोफत दंत तपासणी करण्यात आली. दंतरोग तज्ञ डॉ. प्राची गांधी व डॉ. अर्पणा पवार यांनी रुग्णांची दंत तपासणी करुन त्यांना मार्गदर्शन केले. या शिबिरातील गरजूंची ओरल सर्जन डॉ. संजय असनानी, डॉ. हरीष सलुजा जबड्याचा फ्रॅक्चर इम्लांट बसविणे, अक्कल दाढ काढण्याचे उपचार करणार आहेत. तर डॉ. कोमल ठाणगे, डॉ. अश्विनी पवार वेडेवाकडे दात सरळ करणे आदी उपचार करणार आहेत. लहान मुलांचे तज्ञ डॉ. प्रणव डुंगरवाल, डॉ. अमृता देडगावकर, डॉ. तृप्ती डुंगरवाल लहान मुलांचे दात काढणे, सिमेंट बसवणे, रूट कॅनल करणे आदी उपचार करणार आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. डॉ. प्रकाश कांकरिया यांनी आरोग्य मंदिर उभारणीपासूनच प्रकाश छल्लानी व परिवाराचे सहकार्य राहिले असल्याचे स्पष्ट करुन आभार मानले.