अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक शहर सरचिटणीसपदी अनिस शेख यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादीचे शहर युवक अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी शेख यांच्या नियुक्तीची घोषणा करुन शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जुनेद बागवान, सैफ बागवान, इकराम बागवान, फरहान सय्यद, सोनू सय्यद, जाहिर सय्यद, शानूर शेख, आबिद शेख, मतीन भाई आदी उपस्थित होते.
पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार शरद पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, युवक प्रदेश अध्यक्ष महबूब शेख, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर म्हणाले की, अनिस शेख यांचे सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. शहरामध्ये सर्व समाजाला बरोबर घेऊन त्यांचे सामाजिक कार्य सुरू असून, अन्याय विरोधात आवाज उठवून समाजाला न्याय मिळवून देण्याची त्यांची भूमिका राहिली आहे. तर बेरोजगार युवकांना रोजगार देण्याचे काम त्यांनी केले असून, समाजातील युवकांना सातत्याने योग्य पद्धतीने दिशा देण्याचे कार्य ते करत असल्याचे त्यांनी सांगितले.
युवक अध्यक्ष प्रकाश पोटे म्हणाले की, अनिस शेख याचा युवकांमध्ये दांडगा जनसंपर्क असल्याने व त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची शहर सरचिटणीसपदी निवड करण्यात आली असून, या निवडीबद्दल पक्षाशी युवक मोठ्या प्रमाणात जोडला जाणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना अनिस शेख म्हणाले की, पक्षाने दिलेल्या पक्षाचे ध्येय धोरणानुसार काम करुन दिलेली जबाबदारी निश्चितपणे सांभाळणार आहे. लवकरच राष्ट्रवादी युवकचा नोकरी मिळावा घेऊन युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
