देवीच्या महाआरतीने उत्सवाची सांगता
गुलमोहर रोड होणार दिव्यांनी प्रकाशमान -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराचे सर्वात जुने उपनगर म्हणून गुलमोहर रोडची ओळख आहे. या दुर्लक्षित राहिलेल्या परिसराचा विकास साधण्यात आला आहे. या रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आले. या रस्त्याची राहिलेली अंतिम लेयर टाकण्याचे काम देखील पूर्ण होणार आहे. तर या रस्त्यावर लाईटीचे खांब लावून हा रस्ता प्रकाशमान केला जाणार असल्याचे आश्वासन देऊन, दुर्लक्षीत भागांचा अंधकार दूर करुन विकास कामे लार्गी लावली जात असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

गुलमोहर रोड येथील मोरया युवा प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त महिला व विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रारंभी देवीची महाआरती करण्यात आली. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, नगरसेवक बाळासाहेब पवार, सुनिल त्र्यंबके, निखील वारे, अभिजीत खोसे, वैभव ढाकणे, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन मदान, हरजितसिंह वधवा, जनक आहुजा, मनोज मदान, अनिश आहुजा, राजेंद्र कंत्रोड, गुलशन कंत्रोड, राकेश गुप्ता, सुरेश म्हस्के, प्रितपालसिंह धुप्पड, सतीश गंभीर, जय रंगलानी, कैलास नवलानी, करन धुप्पड, जतीन आहुजा, अभिमन्यू नय्यर, दामोदर माखिजा, अमरजितसिंह वधवा, गोविंद खुराणा, जस्मितसिंह वधवा, विवेक गुप्ता, राजा नारंग, आर.जे. प्रसन्ना, सुफी गायक पवन नाईक, महेश सातपुते, सागर गुंजाळ, सत्यजीत ढवण, वैभव वाघ, दिपक नवलानी, संतोष लांडे, माजी शहर अभियंता रोहिदास सातपुते, अभिलाशा मदान, अर्चना मदान, अपर्णा मदान, गायत्री जोशी, अनुराधा खोसे, वैशाली टाक, वर्षा घुले, सुमन दरंदले, सरस्वती सावंत, चंदा शिंदे, स्मिता तळेकर, सुषमा पाटील, शारदा पोखरकर, सुरेखा बोरुडे, मंजरी कपोते आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पुढे आमदार जगताप म्हणाले की, गुलमोहर रोडवर मोठी नागरी वस्ती असून, पूर्वी या भागात सण-उत्सव काळात कार्यक्रम होत नव्हते. मात्र मोरया युवा प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सव व नवरात्र उत्सव काळात विविध उपक्रम घेऊन नागरिक, महिला व विद्यार्थ्यांसाठी एक व्यासपीठ निर्माण करुन देण्यात आले. प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरु असलेले उपक्रम कौतुकास्पद असून, नवरात्र उत्सवात घेण्यात आलेल्या उपक्रमाद्वारे महिला व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
अर्जुन मदान म्हणाले की, गणेशोत्सव व नवरात्र उत्सवात प्रतिष्ठानच्या माध्यमातून विद्यार्थी व महिलांसाठी विविध उपक्रम घेऊन त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे कार्य केले जात आहे. उपनगर परिसरात धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक चळवळ रुजविण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाहुण्यांचे स्वागत मनोज मदान यांनी केले.
प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्र उत्सव काळात दांडिया, फॅन्सी ड्रेस, संगीत खुर्ची, भजन आदी विविध स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांसह महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विजेत्या महिला व विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते चांदीची गणपतीची प्रतिमा व घड्याळचे बक्षिस देण्यात आले.

