अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी मारूती पवार यांची नियुक्ती करण्यात आली. मुंबई येथील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात सोशल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी पवार यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार केला. यावेळी सुदाम गांधले, दीपक लिपाने, मतिन शेख आदी उपस्थित होते.
भिंगार येथील मारूती पवार हे अनेक वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. आमदार संग्राम जगताप यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या शहर सरचिटणीसपदाची जबाबदारी देखील सांभाळली आहे. त्यांचे राजकीय, सामाजिक कार्य व युवकांमध्ये असलेला जनसंपर्काची दखल घेऊन त्यांची सोशल मीडिया विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आमदार संग्राम जगताप व आमदार अरुणकाका जगताप यांनी या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. मारुती पवार यांनी पक्षाचे ध्येय-धोरण व आमदार संग्राम जगताप यांचे विकास कार्य सोशल मीडियाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले जाणार असल्याची भावना व्यक्त केली.
