अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी हाजी शौकतभाई तांबोळी यांची नियुक्ती झाल्याबद्दल माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी त्यांचा सत्कार केला. राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात झालेल्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, युवक शहर अध्यक्ष प्रकाश पोटे, फारूक रंगरेज, किसन बेदमुथा, ॲड. झरेकर, आनंद गर्दे, भीमराजे कराळे, साळुंके ताई, उज्वला कळमकर, पापामिया पटेल, उमेश भांबरकर, लकी कळमकर आदी उपस्थित होते.
माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी तांबोळीच्या यांच्या निवडीबद्दल अभिनंदन व्यक्त करुन त्यांना पुढील राजकीय वाटचलीस शुभेच्छा दिल्या.
