प्रत्येक चळवळीतला कार्यकर्ता समाजकारणामुळे जोडला गेला -हाजी शौकतभाई तांबोळी
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील अलकरम सोशल ॲण्ड एज्युकेशनल सोसायटीच्या वतीने हाजी शौकतभाई तांबोळी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. जहीर मुजावर, शेरअली शेख, समीर सय्यद, इमरान भाईजान, तौफिक तांबोळी, ताहीर शेख, आबिद दुल्हेखान आदी उपस्थित होते.
डॉ. जहीर मुजावर म्हणाले की, शहराच्या सामाजिक चळवळीला शौकतभाई तांबोळी नेहमीच बळ देण्याचे काम करत आहे. समाजकारणात त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले असून, राजकारणात राहून देखील त्यांच्या हातून दुर्बल, वंचित घटकांची सेवा घडणार आहे. तर अलकरम सोशल ॲण्ड एज्युकेशनल सोसायटीच्या सामाजिक कार्याला त्यांचे नेहमीच सहकार्य लाभत असल्याचे सांगितले. 
सत्काराला उत्तर देताना हाजी शौकतभाई तांबोळी यांनी प्रत्येक चळवळीतला कार्यकर्ता समाजकारणामुळे जोडला गेला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याला हातभार लाऊन वंचित, दुर्लक्षीत घटकांचे प्रश्न सोडविण्यास मदत केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
