सॅमसंगच्या प्रोडक्ट्सवर दिली जाणार आकर्षक सूट
अहमदनगर (प्रतिनिधी)- सॅमसंग कंपनीचे जिल्ह्यातील अधिकृत डिस्ट्रिब्युटर राम एजन्सीच्या वतीने घेण्यात आलेल्या डिलर मेळाव्यात दिवाळी खरेदीच्या पार्श्वभूमीवर प्रोडक्ट्सवर दिल्या जाणाऱ्या बंपर डिस्काउंट आणि ऑफर्सची घोषणा करण्यात आली. मागील 45 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी ग्राहकांमध्ये मोठा विश्वास निर्माण केलेल्या राम एजन्सीच्या सावेडी, नवीपेठ व मार्केटयार्ड शाखेबरोबरच जिल्ह्यातील डिलरकडून ही ऑफर ग्राहकांना दिवाळीच्या खरेदीवर मिळणार आहे.
राज पॅलेस येथे राम एजन्सीच्या वतीने जिल्ह्यातील डिलरचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात सॅमसंग कंपनीचे कोरिया येथून आलेले होरीन पर्क यांनी दिवाळी खरेदीवरील ऑफर्सची घोषणा केली. यावेळी रिजनल सेल्स मॅनेजर आशुतोष चकाडी, अभिजीत वेल्हाळ, समीर मारवाह, मुकुल संगवान, भुषण कुरमभट्टी, शशांक कक्कर, प्रकाश कानडे, विपीन भट, राम मेघांनी, विष्णू मेघांनी, परमानंद मेघांनी, जेठानंद मेघांनी, पंकज मेघांनी, रवी मेघांनी, मोनेश मेघांनी, हर्ष मेघांनी आदी उपस्थित होते.
राम एजन्सीच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. तर या दिवाळीत राम एजन्सी व त्यांच्या डिलरच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या ऑफरप्रमाणे दिवाळी खरेदीवर विशेष सूट दिली जाणार आहे.
या मेळाव्यात सॅमसंग कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे विविध उत्पादने प्रदर्शन भरविण्यात आले होते. या मेळाव्याला जिल्ह्यातील डिलर बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जाहीर करण्यात आलेल्या ऑफरमुळे ग्राहकांची दिवाळीचा आनंद द्विगुणीत होणार आहे. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन राम एजन्सीच्या वतीने करण्यात आले आहे.